Eknath Shinde| Lata Shinde|
Eknath Shinde| Lata Shinde| 
मुंबई

शिंदेंच्या स्वागतात मिसेस मुख्यमंत्र्यांची धमाल : ड्रम वाजतानाचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींना ३० जूनला पूर्णविराम मिळाला. एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. गेल्या १५-२० दिवसांपासून बाहेर असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊनच घरी परतले. यावेळी कुटूंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

एकनाथ शिंदे घरी पोहचल्यानंतर कुटूंबियांनी, त्यांच्या समर्थकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. यात सर्वात आनंदी दिसल्या त्या त्यांच्या पत्नी लता शिंदे. एकनाथ शिंदेच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांनी ढोल ताशा पथकाच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. यावेळी मिसेस मुख्यमंत्र्यांना ड्रम वाजवण्याचा मोह आवरला नाही. लता शिंदे या देखील पथकात सहभागी झाल्या आणि त्यांनी ड्रम वाजवत एकनाथ शिंदेचे स्वागत केले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

२१ जूनला घरातून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आज थेट मुख्यमंत्री म्हणूनच घरी परतल्यामुळे त्यांच्या समर्थकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सोमवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विश्वासजर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक दिवसांनी आपल्या स्वगृही परतले. गेल्या १५ दिवसांपासून एकनाथ शिंदे हे कुटुंबापासून दूर होते, त्यामुळे यावेळी कुटुंबिय देखील भावूक झाले होते.

विधानभवनातून बाहेर पडल्यानंतर भर पावसात एकनाथ शिंदेंनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला आणि दिवंगत आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमाला भेट दिली आणि अभिवादन केलं. त्याआधी त्यांनी चैत्यभूमीला भेट देत बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री यावेळी कोणत्याही महागड्या गाडीतून नाही तर बसमधून आमदारांसोबत या सर्व ठिकाणी फिरले. पावसात भिजत त्यांनी या ठिकाणी भेट घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT