शिवसेनेत महिलांना मिळणार प्राधान्य ; उद्धव ठाकरेंनी दिला शब्द

Uddhav Thackeray| तुमच्या साथीने पुन्हा नव्या जोमाने शिवसेना उभी करणार, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
 Uddhav Thackeray Latest news
Uddhav Thackeray Latest news

मुंबई : शिवसेना महिला संघटक आणि संपर्कप्रमुख, महिला विभाग संघटक यांची आज शिवसेनाभवनात बैठक पार पडली. अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या. शिवसेनेच्या (Shivsena) रणरागिणी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबत आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत कार्यरत राहतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले.

काल रिक्षा वल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता, सुसाट सुटला होता, सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं अपघात तर होणार नाही ना, असं त्यांना वाटत असाव, काल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा माईक खेचला, पुढे काय काय खेचतील, ते माहीत नाही, पण आता महिलांना पुढे आणलं पाहिजे, पुरुषांनी गद्दारी केली, पण महिला पाठीशी उभ्या राहिल्या असं, अशी मिश्लिक टिप्पणीही उद्धव ठाकरेंनी केली.

 Uddhav Thackeray Latest news
पाटणमध्ये ना पक्ष, ना व्होट बँक : शंभुराजे बंडखोरीनंतरही 2024 साठी निश्चिंत आहेत

याचवेळी त्यांनी हिंगोलीतील शिवसैनिकांशीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. शिवसेनेत कोण आले, कोण गेले याची आता पर्वा नाही. तुमच्या साथीने पुन्हा नव्या जोमाने शिवसेना उभी करणार, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना दिला. लवकरच तुमच्या भेटीला येईन, असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

यावेळीशिवसेना भवन या ठिकाणी झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील महिला जिल्हाप्रमुख, जनसंपर्क प्रमुख उपस्थित होते. दिवाकर रावते (माजी मंत्री), सुभाष देसाई (खासदार), अरविंद सावंत (खासदार), आदेश बांदेकर (सचिव), अनिल देसाई (खासदार), संजय राऊत (खासदार), आदित्य ठाकरे (पर्यावरण मंत्री) हे शिवसेना भवनात उपस्थित होते. याशिवाय, किशोरी पेडणेकर (माजी महापौर ) २) विशाखा राऊत (नगरसेविका) ३) श्रद्धा जाधव (माजी महापौर), श्रीमती मनीषा कायंदे (आमदार) व इतर जिल्हाप्रमुख, जनसंपर्क प्रमुख महिला यांच्यासह जवळपास शंभरहून अधिक महिला उपस्थित होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com