Maharashtra Political News : केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक जाहीर केली. त्यानुसार देशभरात सात, तर राज्यात पाच टप्प्यांत निवडणूक होणार आहेत. मात्र, या निवडणुकीतही गुजरात आणि महाराष्ट्र असा भेद केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पाच तर गुजरातमध्ये एकाच टप्प्यात मतदान कसे, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता आहे. Maharashtra Vs Gujrat
राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पळवण्यात येत आहेत. विकासाबाबत केंद्र सरकार गुजरातला झुकते माप देत असल्याची टीका कायम होत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे फक्त गुजरातचेच पंतप्रधान आहेत का, असा टीकेचा सूर विरोधकांतून येतो. आता लोकसभा निवडणुकीतही गुजरात-महाराष्ट्र असा भेद केल्याचा आरोप होऊ लागले आहेत. लोकसभेच्या 48 जागा असलेल्या महाराष्ट्रात पाच, तर 26 जागा असलेल्या गुजरातमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होत आहे. यावरून विरोधकांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाविकास आघाडीतील जागावाटपाची बैठक पार पडली. या वेळी नाना पटोलेंनी (Nana Patole) निवडणूक आयोगाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गुजरातमध्ये लोकसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होत असताना महाराष्ट्रात पाच टप्प्यांत का घेतली जात आहे? निवडणूक आयोगच असे राजकीय पक्षासारखे वागत असेल तर लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे होमस्टेट असल्यानेच असा निर्णय झाल्याचा आरोपही पटोलेंनी केला आहे.
देशात 20 मार्च ते 4 जून असा लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) उत्सव पार पडत आहे. उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यात सात टप्प्यांत निवडणूक होत आहे, तर राज्यात निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिलला पहिला, तर 20 मे रोजी शेवटचा टप्पा असणार आहे, तर गुजरातमध्ये एकाच टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी निवडणूक होणार आहे. गुजरातमध्ये भाजपची ताकद मोठी असल्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, 2019 मध्ये काँग्रेसला गुजरातमध्ये एकही जागा मिळालेली नाही.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.