Eknath Shinde On MNS : महायुतीत मनसे सहभागी होणार? मुख्यमंत्री शिंदेंनी दिले 'हे' संकेत

Maharashtra Political News उद्धव ठाकरेंना शिवतीर्थ मैदानावर सभा घेण्याचा कुठलाच नैतिक अधिकार उरलेला नाही.
Raj Thackeray, Eknath Shinde
Raj Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुती शंभर टक्के 400 चा आकडा पार करणार. राज्यात 45 जागा निवडणूक येतील, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) राज्यात मनसेलाही सोबत घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. Eknath Shinde On MNS

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांत जागावाटपासाठी वेगवान घडामोडी होत आहेत. भाजपच्या दुसऱ्या यादीत राज्यातील 20 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत. मात्र, 400 जागांचे ध्येय पार करण्यासाठी राज्यात मनसेलाही सोबत घेण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना छेडले असताना त्यांनी मनसेला महायुतीत सहभागाचे संकेत दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray, Eknath Shinde
Eknath Shinde News : मुंबईतील सभा फ्लॉप, ते फॅमिली गॅदरिंग; शिंदेंनी उडवली आघाडीची खिल्ली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महायुतीत जागावाटपावरून कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. प्रत्येक पक्षाला सन्मानजनक जागा मिळणार आहेत. तसेच राज्यातील 45 जागांवर महायुतीचा निश्चित विजय होणार आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि आमची विचारधारा एकच आहे. मात्र, योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील, असे शिंदेंनी मनसेबाबत सूचक विधान केले. यामुळे आगामी काळात मनसे महायुतीचा भाग होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका करताना शिंदे म्हणाले, शिवतीर्थ मैदानावरून बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा नारा दिला होता. उद्धव ठाकरेंनी मात्र बाळासाहेबांचे विचार कधीच सोडले आहेत. हिंदुत्वविरोधी पक्षांच्या मांडीला मांडी लावून ते बसत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना शिवतीर्थ मैदानावर सभा घेण्याचा कुठलाच नैतिक अधिकार उरलेला नाही.

(Edited by Sunil Dhumal)

R

Raj Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray : हिंगोलीत हेमंत पाटलांना चितपट करण्यासाठी उद्धव ठाकरे टाकणार मोठा डाव

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com