Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule Sarkarnama
मुंबई

NCP Political News: निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला दिलासा; 'या' साठी 8 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Election Commission Of India : शरद पवार गटाने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत वाढवून मागितली होती.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात पोहचला आहे. आयोगाने दोन्ही गटाला आप आपली भूमिका मांडण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली होती. ती १८ ऑगस्टला संपणार आहे. याचवेळी शरद पवार गटाने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत वाढवून मागितली होती. आता निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उत्तर सादर करण्यासाठी ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी 30 जूनला सत्तेत सहभागी होण्याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं होतं. या पत्रात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोघांच्या गटाला नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये पक्षाचं चिन्ह आणि पक्षावर दावा सांगण्यासाठी लागणारे महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती मागवण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार(Sharad Pawar) गटाने निवडणूक आयोगाकडे अजित पवार गटाने कोणती कागदपत्रे दिली आहेत त्यांची यादी द्या म्हणजे त्यावर आम्हाला उत्तर देता येईल, असा मेल केला होता. मात्र, त्याला निवडणूक आयोगाकडून कुठलंही उत्तर देण्यात आलं नव्हतं. त्यानंतर शरद पवार गटाने आता पुन्हा 4 आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला होता. पण आता निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मुदतवाढ दिली आहे.

अजित पवार आणि शरद पवार गट यांच्यातील पक्षांतर्गत वाद आता निवडणूक आयोगाकडे (Election Commission Of India) पोहोचल्याने राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर निर्णय होणार आहे. याकरता पक्षासंदर्भातील कागदपत्रे, शपथपत्र वगैरे दोन्ही गटांना सादर करावी लागणार आहेत.अजित पवार यांनी २ जुलै रोजी सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत अनेक आमदार असून त्यापैकी आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

दरम्यान, ३० जून रोजी लिहिलेले एक पत्र निवडणूक आयोगाला ५ जुलै रोजी प्राप्त झाले आहे. या पत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अध्यक्षपदाचा ठराव आणि ४० नेत्यांची शपथपत्रेही यावेळी सादर करण्यात आली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT