Ajit Pawar Meet Nawab Malik : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार तडकाफडकी नवाब मलिकांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Maharashtra Politics : मलिकांच्या सुटकेसाठी शरद पवार - अजित पवार या दोन्ही नेत्यांनी फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.
Ajit Pawar - Nawab Malik
Ajit Pawar - Nawab Malik Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai: सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. सोमवारी मलिक तुरुंगाबाहेर आले. पण आता राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर ते कुठल्या गटाला साथ देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांनी मलिक आपल्या गटाला पाठिंबा देतील असा दावा केला आहे. पण आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी आठ दिवसांचा अवधी मागितला आहे. याचदरम्यान, मोठी राजकीय घडामोड समोर आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मलिकांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बुधवारी नवाब मलिकांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. मलिक तुरुंगाबाहेर आल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्यात पहिल्यांदाच भेट होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मलिक यांची फोनवरून चौकशी केल्याचे समोर आले आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे या नवाब मलिकांच्या स्वागतासाठी काही तास जेलबाहेर उपस्थित होत्या. तसेच मलिकांच्या सुटकेसाठी शरद पवार - अजित पवार या दोन्ही नेत्यांनी फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.

Ajit Pawar - Nawab Malik
Sharad Pawar Phone To Malik : नवाब मलिक यांना शरद पवारांचा फोन; काय झाली चर्चा?

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. मलिक साधारण १७ महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. मंत्री असतांनाच त्यांच्यावर कारवाई झालेली होती. त्यानंतर राज्यात शिवसेनेत बंड झालं अन् महाविकासआघाडी सरकार कोसळलं. २ जुलै रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करुन सत्तापक्षाला समर्थन दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली आहे. त्यातच नवाब मलिकांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे मलिक कोणत्या गटामध्ये जातात, हा प्रश्न आहे.

शरद पवारां (Sharad Pawar) चे कट्टर समर्थक म्हणून मलिकांची ओळख आहे. पण बदलेल्या राजकीय स्थितीत ते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी ज्येष्ठ नेत्यांसारखी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांची पाठराखण करण्याचा वेगळा निर्णय घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्यावरील आरोपांचे गंभीर स्वरुप पाहता ते सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेऊन स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवू शकतात, असेही बोलले जात आहे.

Ajit Pawar - Nawab Malik
Nashik NCP News: शरद पवार गटाने एका रात्रीत उभारले नवे राष्ट्रवादी भवन!

अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मलिकांची कन्या सना मलिक यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे मलिक यांना लवकरच जामीन मिळेल असा दावा केला जात होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांना जामीन मंजूर केला. यामुळे पुन्हा एकदा ते राष्ट्रवादीच्या सत्ताधारी गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली.

पण मलिक आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत, तोपर्यंत ही केवळ एक अटकळ ठरणार आहे.नवाब मलिक यांच्याशी दोन्ही गटातील नेत्यांशी संपर्क साधला आहे. दोन्ही गटाकडून त्यांना विचारणा करण्यात आली आहे. अजित पवार आणि नवाब मलिकांच्या भेटीत नेमकं काय चर्चा होते याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com