Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, दिले 'हे'आदेश

Election Commission To Take Action against Uddhav Thackeray after Bjp Leader Aashish Shelar filed complaint : मुंबईतील सहा लोकसभा जागांसाठी 20 मे रोजी मतदान पार पडले. पण हे मतदान सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी आचारसंहितेचा भंग करत सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेतली होती.

Deepak Kulkarni

Mumbai News : शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिलीच सर्वात मोठी निवडणूक असल्याने माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट)प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ती प्रतिष्ठा पणाला लागली होती. ठाकरेंनी बंडखोरांसह भाजपला धडा शिकवण्याचा चंग या निवडणुकीत बांधला होता. आणि त्याचाच भाग म्हणून आक्रमकतेची धार आणखी टोकदार करत उद्धव यांनी मोदी- शाह, शिंदे- फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.पण एक्झिट पोलमध्ये मुसंडी मारलेल्या उद्धव ठाकरे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने निकालाआधीच सर्वात मोठा धक्का दिला आहे.

मुंबईतील सहा लोकसभा जागांसाठी 20 मे रोजी मतदान पार पडले.पण हे मतदान सुरू असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आचारसंहितेचा भंग करत सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेतली होती.ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने आता उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात तपास करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत मंद गतीने चालणारी मतदान प्रक्रिया,वगळलेली नावे या सगळ्यांमुळे त्यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला होता.या नंतर निवडणूक आयोगाकडे आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने कारवाईला सुरुवात केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात तपास करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.राज्य निवडणूक आयोग झालेली पत्रकार परिषद तपासून पाहणार आहे. तसेच या पत्रकार परिषदेत काही वादग्रस्त निदर्शनास आल्यास निवडणूक आयोग कारवाई करण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT