Nagesh Ashtikar: ठाकरेंच्या शिलेदाराला पराभवाची भीती; मतमोजणी केंद्राची केली तीन वेळा पाहणी

Hingoli Lok Sabha Constituency 2024: निकालापूर्वी आष्टीकर यांनी मतमोजणी केंद्रावर दोन दिवसात तब्बल तीन वेळा हजेरी लावली. आष्टीकरांच्या मनात पराभवाची भीती आहे का?
Hingoli Lok Sabha Constituency 2024:
Sarkarnama
Published on
Updated on

मराठवाड्यातील लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघ सर्वात चर्चेत राहिला. एक्झिट पोलनुसार, हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचा उमेदवार पिछाडीवर आहे.

ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर विजयी होणार असल्याचं चित्र आहे. आष्टीकरांना मतदारांनी कौल दिल्याचे एक्झिट पोलने स्पष्ट केले आहे. खासदार होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही आष्टीकरांच्या मनात धाकधुक पसरली आहे.

निकालापूर्वी आष्टीकर यांनी मतमोजणी केंद्रावर दोन दिवसात तब्बल तीन वेळा हजेरी लावली. त्यामुळे आष्टीकर यांच्या मनात पराभवाची भीती आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानपदी विराजमान झालेले पाहायचे आवडेल, असे सांगून आष्टीकरांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

हिंगोलीतील (Hingoli Lok Sabha Election Result 2024)जनतेलाही फोडाफोडीचं राजकारण रुचलेलं नाही. शिंदे गटाने हिंगोलीत बाबूराव कदम-कोहळीकार यांना तिकीट देऊन नवीन चेहऱ्याला संधी दिली. लोकसभेच्या गोंधळात खासदार हेमंत पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागे घेतली आणि तिथेच त्यांचा डाव फसला. आघाडीकडून आष्टीकरांनी कडवे आव्हान दिले आहे.

ठाकरे गटाने हिंगोली मतदारसंघात चांगलीच तयारी केली होती. ठाकरेंनी निवडणुकीआधी सभा घेऊन हिंगोलीत चांगलीच वातावरण निर्मिती केली. हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपचे इच्छुक असलेले रामदास पाटील सुमठाणकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला.

Hingoli Lok Sabha Constituency 2024:
Kolhapur Lok Sabha 2024: काउंटडाऊन सुरू...; कार्यकर्त्यांची घालमेल अन् उमेदवारांचे देव पाण्यात

रामदास पाटील सुमठाणकर यांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांची उमेदवारी बदलावी आणि भाजपचा उमेदवार द्यावा, अशी मागणी केली होती. रामदास पाटलांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com