Rashmi Thaceray-Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Rashmi Thackeray : अरेरे..रश्मी वहिनींचा केविलवाणा प्रयत्न ; शिंदे गटाचा टोला ; दोन्ही गट आमने-सामने

Rashmi Thackeray : एकनाथ शिंदे यांच्या देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे जाणार असल्याचे वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामा ब्युरो

ठाणे : टेंभी नाक्यावरील (Tembhi Naka) देवीच्या दर्शनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) या आज (गुरुवारी) सांयकाळी जाणार आहेत. त्यांच्या हस्ते या ठिकाणी आरती होणार आहे. त्यामुळे राजकारण पेटलं आहे. (Rashmi Thackeray latest news)

शिवसेनेचे नेते, स्वर्गीय आनंद दिघे यांनी टेंभी नाका येथे जय आंबे देवीची स्थापना केली होती. या ठिकाणी दरवर्षी नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येतो. या 'जय आंबे' देवीच्या महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांचाही सहभाग असतो.

यंदा एकनाथ शिंदे यांच्या या देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे जाणार असल्याचे वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्यामधील वादामुळे आधीच टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव यंदा अधिक चर्चेत आहे. शिंदे आणि विचारे यांचे राजकीय गुरु आनंद दिघेंनी सुरु केलेल्या या उत्सवाला रश्मी ठाकरे हजेरी लावणार असल्याने गर्दी गोळा करण्यासाठी मुंबईतून महिला आणल्या जातील अशी शक्यता शिंदे गटाने व्यक्त केली आहे.

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी रश्मी ठाकरेंच्या ठाण्यातील या दौऱ्यासंर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना गर्दी जमवण्याचा प्रयत्न या निमित्ताने ‘शिल्लक सेने’कडून केला जाईल असं म्हटलं आहे. यासाठी मुंबईतील महिलांना ठाण्यात आणलं जाईल असंही शितल म्हात्रेंनी म्हटलं आहे.

म्हात्रे यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे की, पहिल्यांदा रश्मी वहिनी ठाण्याला जात आहेत. त्यामुळे महिला कमी पडताय किंवा गर्दी करावी या दृष्टीने ते महिलांना ठाण्याला जायला सांगताय. मुंबईतल्या माहिला ठाण्याला जाणार वहिनींसाठी तर मला वाटतं हे फारच केविलवाणं आहे,” अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली आहे.याला रश्मी ठाकरे काय उत्तर देणार हे आज सांयकाळी कळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT