BJP President : जेपी नड्डांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवे अध्यक्ष कोण ?

BJP President : लोकसभा निवडणूका (Lok Sabha Election 2024) नड्डा यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जाणार असल्याचेही बोलले जाते.
j p nadda.jpg
j p nadda.jpgSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांचा कार्यकाळ येत्या जानेवारी महिन्यात संपत आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कुणीची नियुक्ती होते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवे अध्यक्ष कोण? याबाबत भाजपाच्या गोटात चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (BJP President news update)

भाजपच्या घटनेप्रमाणे नड्डा यांना अजून तीन वर्ष अध्यक्षपदी राहू शकतात, त्यामुळे त्यांची फेरनियुक्ती होणार असल्याची चर्चा सध्या भाजपच्या गोटात आहे. येत्या लोकसभा निवडणूका (Lok Sabha Election 2024) नड्डा यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जाणार असल्याचेही बोलले जाते.

सध्या भाजपामध्ये अध्यक्ष बदलाबाबत कोणतीही चर्चा नाही, जेपी नड्डा हेच पुन्हा एकदा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे. भाजप 2024 च्या निवडणुका नड्डा यांच्याच नेतृत्वाखील लढवण्याची शक्यता नाकारता येत आहे.

j p nadda.jpg
Dasara Melava : आम्हीच खरी 'शिवसेना' हे दाखवण्यासाठी ठाकरे-शिंदे गट सज्ज , गर्दी जमविण्याचे 'टार्गेट'

भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना पक्षातून सध्या बाजूला केले गेले असल्याची चर्चा आहे. गडकरी यांनी त्यांच्या मंत्र्यालयाने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांना अध्यक्ष करावे, अशी चर्चा भाजपचे काही नेते दबक्या आवाजात करीत आहे. तर गडकरी यांना मोठी जबाबदारी देणार असल्याचेही समजते. एकीकडे कॉग्रेस अध्यक्षपदाची निवडणुकीत रंगत येत असताना आता भाजपच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याचीही चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com