Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : तुम्ही रोज माझा माणूस फोडा, पण...; ठाण्यात पोहचण्याआधीच ठाकरेंनी सोडला 'वर्षा'च्या दिशेने बाण

Thane Politics : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी ठाण्यात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बरसणार आहेत

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी ठाण्यात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बरसणार आहेत. पण, त्याआधीच मातोश्रीवरूनच ठाकरेंनी बाण सोडून शिंदेंना इशाराच दिल्याचे दिसत आहे. ' तुम्ही रोज माझा माणूस फोडा.पण, माझा निष्ठावान शिवसैनिक तेवढ्याच ताकदीने पेटवून उठेल. त्यात तुम्ही होरपळून निघाल, असे सांगून ठाकरेंनी नगरसेवक फोडाफोडीच्या शिंदेंच्या राजकारणावर निशाणा साधला. एकूणच, ठाण्याला निघालेल्या ठाकरेंच्या शब्दांना भलतीच धार आली असून, जेव्हा ठाकरे ठाण्यात पोचतील; तेव्हाच मात्र, खरोखरीच ठाकरे - शिंदे यांच्यातील युध्द आणखीच भडकण्याची भीती आहे.

उद्धव ठाकरे आज (शनिवारी) ठाण्यात हिंदी भाषिकांचा मेळावा घेणार आहेत. पण त्यापूर्वीच त्यांनी मातोश्रीबाहेर जमलेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आजच्या मेळाव्यात त्यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री शिंदे हेच असणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. खरचं तुम्ही दर आठवड्याला माझा माणूस फोडत जा, पण माझे निष्ठावान शिवसैनिक तितक्याच ताकदीने पेटून उठतील. असा इशाराच ठाकरेंनी दिला आहे. इतकेच नव्हे तर, जे गेले त्यांना त्यांचं सुख लख लाभो. पण माझं सुख तुमच्या सोबततीत आहे, असही त्यांनी यावेळी नमुद केलं.

यावेळी बोलताना त्यांनी २००७ मधील एक आठवणही सांगितली, २००७ साली आपण महापालिका निवडणुका जिंकणार की हरणार, असं मला वाटतं होतं. पण निवडणुका झाल्या आणि आपण जिंकलो. त्यावेळीही मातोश्री बाहेर अशीच लोकांची गर्दी जमली होती. त्यातल्या काही महिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्याच अश्रुंचं मोल ज्यांना कळतं ते निष्ठावान आहेत, अशी भावना ही त्यांनी व्यक्त केली.

पण त्या अश्रुंच्या मागे जी मेहनत आहे, त्या मेहनतीने ज्यांना मोठं केलं, त्यांना अजीर्ण झाले आणि ते निघून गेले, मी म्हणेल की हे एक शिवभोजन आहे की, अनेकजण येतात आणि जेवण करून निघून जातात. ते कधीही संपू शकत नाही आणि हीच खरी ताकद आहे, अशा शब्दांत बंडखोर आमदारांना अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लगावला.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT