Narendra Modi News : पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याला विरोध; बाबा आढावांच्या नेतृत्वात २६ पक्ष, संघटना ऐकवटल्या

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येणार आहेत.
Narendra Modi News
Narendra Modi NewsSarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi Pune Tour : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना देण्यात येणार आहे. त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑगस्टला पुणे (Pune) दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, मोदींच्या पुणे दौऱ्याला ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या नेतृत्वात विरोधी पक्ष व विविध संघटना विरोध करणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला 'इंडिया फ्रंट' पुणे कडून विरोध होणार आहे. या इंडिया फ्रंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार गट, शिवसेना (Shivsena) ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पक्ष सहभागी होणार आहेत. एक ऑगस्टला सकाळी ११ वाजता पुण्यातील अलका चौकात काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा या पक्षांनी दिला आहे.

Narendra Modi News
Sharad Pawar Visit PM Modi : शरद पवार हे मोदींसाठी पुण्यात थांबणार की केजरीवालांची विंनती मानणार ?

पुणेकरांनी काळे कपडे घालून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन या पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे. एकूण २६ पक्ष आणि संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत. मणिपूर जळत असताना पंतप्रधान मोदी पुरस्कार स्विकारत आहेत, याला आमचा विरोध असल्याचे काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी सांगितले.

Narendra Modi News
Maharashtra Politic's : काँग्रेस-भाजपला मिळणार नवे प्रभारी; रवींना वगळले, तर पाटलांचा भार कमी करण्याचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सहभागी होणार आहेत. मात्र, आमचा मोदींना विरोध आहे, त्यामुळे आम्ही विरोध करणार आहोत. मणिपूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आंदोलनात सहभागी होणार, असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com