BJP MLA Chitra Wagh Sarkarnama
मुंबई

Chitra Wagh : चित्रा वाघांनी माजी मुख्यमंत्र्यांना करून दिली, फडणवीसांच्या 'त्या' डायलॉगची आठवण...

Chitra Wagh reminds former CM of Fadnavis famous Dialogue: भाजप आमदार चित्रा वाघ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीपूर्वी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रि‍पदाचा शपथविधी अवघ्या काही तासांवर आहे. भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, जल्लोष करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात, त्यांच्या समर्थकांकडून समाज माध्यमांवर पोस्ट शेअर केल्या जात आहेत.

यात विधानपरिषद सदस्य, आमदार चित्रा वाघ यांनी शेअर केलेल्या पोस्टने लक्ष वेधत आहे. देवाभाऊ परत आलाय, असे म्हणत 'मी ‘काडतूस’ आहे…झुकेगा नही!', अशी ही पोस्ट आहे. या पोस्टमध्ये चित्रा वाघ यांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे डिवचलं आहे.

महायुती (Mahayuti) सरकार स्थापनेची, शपथविधीची लगबग सुरू आहे. मुंबईत अवघ्या काही तासांत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तत्पूर्वी चित्रा वाघ यांनी त्यांच्या समर्थनात एक्स खात्यावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

देवाभाऊचा पाच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा काळ हा महाराष्ट्राच्या विकासाच्या इतिहासातला सगळ्यात सोनेरी कालखंड होता, याची आठवण करून देताच, त्यानंतर अडीच वर्षं तो विरोधी पक्षनेता बनून कुटिल लोकांवर तुटून पडला, याची देखील आठवण चित्रा वाघ यांनी विरोधकांना करून दिली. आता तो परत आलाय. त्याचा पिक्चर संपलेला नाही. उलट त्याचा पिक्चर आता ॲक्शननं भरपूर असणार आहे, असे म्हणत चित्रा वाघ यांनी विरोधकांना डिवचलं आहे.

देवाभाऊच्या पिक्चरचं नाव कुणी तरी ‘अकेला फडणवीस’ असं ठेवलं होतं. पण त्याला चौदा कोटी जनतेनं पुन्हा एकदा ‘हिरो’ बनवलं. येस्स. तमाम महाराष्ट्राचा लाडका, जिगरबाज, चाणक्यनीतीत तरबेज, बहिणांचा पाठिराखा, शेतकऱ्यांचा (Farmer) सच्चा साथी, वंचितांचा खंदा आधार असलेला देवाभाऊ पाच वर्षांसाठी अवतरला आहे. आता तो काय करतो ते बघाच... देवाभाऊका असली पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असे म्हणत चित्रा वाघ यांनी विरोधकांना धडकी भरवली आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या एका वाक्याची आठवण करून देताना, ‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे घर मत बसा लेना, मै समंदर हूं, वापस आऊंगा’, असं देवाभाऊ म्हणाला, तेव्हा त्याची खिल्ली उडवली गेली. पण आज हा समुद्रासारख्या विशाल अंतः करणाचा, समुद्राएवढ्या कर्तृत्वाचा, समुद्राइतकी वैचारिक खोली असणारा देवाभाऊ परत आलाय, असे ठणकावून चित्रा वाघ यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

कुटिल कारस्थानांचा चक्रव्यूह भेदला...

‘आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह भेदणं जाणतो’, असं हा आधुनिक अभिमन्यू म्हणाला, तेव्हा त्याची चेष्टा झाली. पण त्यानं कावेबाजांचा, कुटिल कारस्थानांचा चक्रव्यूह भेदला. असा काही भेदला, की त्यातून उडालेल्या तेजाच्या किरणांनी भल्याभल्यांचे डोळे दीपून गेले. कुरुक्षेत्रावरचं युद्ध खूप जटिल, अवघड असणार आहे, हे या अभिमन्यूला माहीत आहे. पण त्याला कर्तृत्वाची कवचकुंडलं मिळाली आहेत. ती घेऊन सर्वशक्तिनिशी तो परत आलाय, याची आठवण चित्रा वाघ यांनी करून दिली.

नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी...

‘मी पुन्हा येईन’ असं देवाभाऊ म्हणाला, तेव्हा त्याच्याविरुद्ध पाच वर्षं सातत्यानं कटकारस्थानांचे डोंगर रचले गेले; पण तो परत आलाय! परत आलाय गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, असे सांगून यापुढे राज्यात फक्त विकासाचे राजकारण चालणार असे चित्रा वाघ यांनी सुचवले आहे.

आता परत आलाय...

‘देवाभाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है’ असं म्हणणारा देवाभाऊ पाच वर्षांआधी जे बोलला, ते त्यानं करून दाखवलंय दोस्तो आणि जे नाही बोलला, ते ‘डेफिनेटली’ करण्यासाठी आता परत आलाय. ‘फडतूस नाही, काडतूस आहे. झुकेगा नही घुसेगा साला’ असं तो म्हणाला होता. येस्स. या देवाभाऊनं ‘फडतूस’ लोकांना ‘काडतूस’ बनून पाताळात गाडलं. आता ‘झुकण्या’साठी नाही, तर ‘घुसण्या’साठी तो परत आलाय, असेही चित्रा वाघ यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT