Radhakrishna Vikhe : विखेंचे मंत्रीपद फायनल ? त्यांच्याबरोबर कोणाला संधी, याचीच चर्चा जास्त...

Radhakrishna Vikhe Patil Ministerial Role Confirmed in Maharashtra Government: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे यांना मंत्रीपद निश्चित मानले जात असतानाच, त्यांच्याबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातून आणखी कोणाला संधी मिळणार याची चर्चा रंगली आहे.
Radhakrishna Vikhe
Radhakrishna VikheSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : महायुती सरकारच्या शपथविधीची मुंबईत लगबग सुरू आहे. राज्याच्या प्रमुख तिघांचा शपथविधी होईल, असे सुरवातीला होईल. त्यानंतकर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सांगितले जात आहे.

मंत्रि‍पदावर कोणाची वर्णी लागणार याची संपूर्ण राज्याला उत्सुकता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे यांना कोणते खाते मिळते, याकडे लक्ष लागले असून, त्यांच्याबरोबर आणखी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघापैकी दहा मतदारसंघात महायुतीने विजय मिळवली आहे. भाजपने चार, राष्ट्रवादी काँग्रेसने चार आणि शिवसेना पक्षाचे दोन आमदार आहेत. यात भाजपचे ज्येष्ठ अन् दिग्गज नेते राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांना मंत्रीपद निश्चित असल्याचे मानले जाते.

माळवत्या महायुती सरकारमध्ये विखे यांच्याकडे राज्यातील पहिल्या तीन मंत्रिपदापैकी महसूल खात्याचे मंत्रीपद होते. 'देवेंद्र 3.O' मंत्रिमंडळात विखेंना कोणते मंत्रीपद मिळते, याकडे आता लक्ष लागले आहेत. तसेच त्यांच्याबरोबर महायुतीमधून कोण मंत्री असेल, याची चर्चा अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. शपथविधीसाठी अधिकृत निरोप न आल्याने संभ्रम वाढला होता.

Radhakrishna Vikhe
Prajakt Tanpure : रुसवे-फुगवे सुरूच; तनपुरे म्हणाले, 'बहुमतानंतरचे सत्तानाट्य जनतेला परवडेना'

राज्यात गेल्या पाच वर्षात अनेक राजकीय प्रयोग झाले. यात झालेली पडझड नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात होते. नवीन दिशेने चाललेल्या राजकारणात स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न सर्वाच राजकीय नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या.

लोकसभेला राज्यात महाविकास आघाडीला (MVA) यश मिळाले, तर विधानसभेत महायुतीने महाविकास आघाडीचा धु्व्वा उडवला. महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळाले. यात अहिल्यानगर जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला असून, तिथं महायुतीने 10 विधानसभा मतदारसंघात यश मिळवले.

Radhakrishna Vikhe
Sanjay Raut : मराठी माणसांवरील हल्ल्यांवरून राऊत कडाडले; वाद अन् आगी लावण्याचं काम भाजपवाल्यांचं...

राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या प्रयोगात बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख व प्राजक्त तनपुरे मंत्री झाले होते. राज्यात पक्षफुटीमुळे सत्तांतर झाले. भाजपच्या पाठबळावर एकनाथ शिंदे नेतृत्वात युती सरकारमध्ये राधाकृष्ण विखे यांना महसूलमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी मिळाली. आता पुन्हा एकदा जिल्ह्याला मंत्रिमंडळात संधीची प्रतीक्षा आहे. भाजपकडून ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश निश्चित मानला जात आहे.

भाजपमधून सलग तिसऱ्यांदा आमदार झालेल्या मोनिका राजळे, ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले आणि विधान परिषद सदस्य राम शिंदे यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, याची भाजप कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्टवादी काँग्रेसची देखील ताकद वाढली आहे.

अजितदादांचे चार आमदार निवडून आले आहेत. हे सर्व तरुण चेहरे आहेत. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना संधी मिळेल, अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमदार विठ्ठलराव लंघे यांना संधी मिळावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी पक्षनेतृत्वाकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com