Sanjay Raut| 
मुंबई

पक्ष सोडणाऱ्यांना खुलासेच द्यावे लागतात : राऊतांनी डिवचले

Sanjay Raut| Gulabrao Patil| शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टीकेवर संजय राऊतांनी पलटवार केला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : 'आम्ही तयार आहोत, आता निवडणुका जरी लागल्या, तरी शिवसेनेला १०० हून जास्त जागा मिळतील, आमची ताकद आम्हाला कळली आहे. जनतेत जी भावना आहे, जी चीड आहे, जी प्रेरणा, उत्साह आहे ते पाहून शिवसेना १०० पेक्षा जास्त जागा जिंकेल,' असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

सोमवारी (४ जून) विधानसभेत वेळी शिंदे- फडवीस गटाने बहुमताचा आकडा पार करत विश्वासर्दशक ठराव जिंकला. नव्या सरकारला १६४ मते मिळाली, तर विरोधात ९९ मते पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलेल्या भाषणावर आज संजय राऊतांनी निशाणा साधला असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.

उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला असणाऱ्या चार लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत केला, असे विचारले असताना राऊत म्हणाले की, या चार लोकांमुळेच आज तुम्हाला सत्ता मिळाली. गेले अडीच वर्षे तुम्ही सत्तेत राहिले, त्याआधीही राहिले, तेव्हाही हे चार लोक ज्यांना तुम्ही आज बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात हे पक्षाचे निष्ठावान आहेत. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. पण ज्यांना जायचं असते त्यांना फक्त बहाणा हवा असतो. ठिक आहे जा तुम्ही पण बहाणे सांगू नका, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.

शिंदे गटाने काढलेला व्हीप झुगारल्यानंतर आदित्य ठाकरे सोडून अन्य १४ आमदारांवर कारवाई करण्यासंदर्भात शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवण्यात आले आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटाने १४ आमदारांना नोटीस पाठवली आहे. तेही बाळासाहेबांचेच शिवसैनिक आहेत. मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला की त्यांनी राज्याची भूमिका न मांडायची असते. पण त्यांनी पक्षाविरोधात बंड का केले? यावर अनेक खुलासे केले. नारायण राणे, छगन भुजबळ, यांचीही भाषणे अशीच होती. बंडखोरी करून पक्ष सोडणारा भाषण करताना खुलासेच देतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिंदे गटातील आमदारांवर बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. बंडखोरी केलेल्या सर्वांना केवळ पैसेच मिळाले नाहीत तर त्यांना आणखीही खूप काही मिळालं आहे. पण आता राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघांनीही महाराष्ट्राच्या हितासाठी काम केले पाहिजे, असे संजय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT