देवेंद्र फडणवीसांचे नागपुरात जंगी स्वागत, म्हणाले विदर्भाला चिंता करण्याची गरज नाही!

फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या स्वागतासाठी विजय रथ तयार करण्यात आला आहे. या रथावर त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी होते.
Devendra Fadnavis News, Nagpur News in Marathi, Vidarbha News
Devendra Fadnavis News, Nagpur News in Marathi, Vidarbha NewsSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या ५० आमदारांच्या गटासोबत युती करून सत्ता स्थापन केल्यानंतर आज प्रथमच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात आगमन झाले. भारतीय जनता पक्षातर्फे विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. (Nagpur News in Marathi)

फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या स्वागतासाठी विजय रथ तयार करण्यात आला आहे. या रथावर त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस, (Amruta Fadanvis) भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे, (Chandrashekhar Bawankule) आमदार परिणय फुके, (Parinay Fuke) शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, खासदार विकास महात्मे, माजी आमदार सुधाकर देशमुख यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी आहेत. सद्यःस्थितीत विमानतळावरून त्यांची मिरवणूक निघाली आहे. थोड्याच वेळात ते विमानतळ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करणार आहेत.(Devendra Fadnavis News)

या रथाद्वारे विमानतळापासून ते धरमपेठेतील त्रिकोणी पार्क येथील निवासस्थानापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात येत आहे. विमानतळावरून निघाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर ते संघ मुख्यालयातही जाण्याची शक्यता आहे. छत्रपती चौक, त्यानंतर ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक, प्रतापनगर चौक, लक्ष्मी नगर चौक, लक्ष्मी भवन चौक त्यानंतर त्रिकोणी पार्क, असा त्यांच्या विजयी मिरवणुकीचा मार्ग निश्‍चित करण्यात आला आहे. लक्ष्मीभवन चौकात मिरवणुकीचे रुपांतर जाहिर सभेत होणार आहे.

Devendra Fadnavis News, Nagpur News in Marathi, Vidarbha News
शिंदे -फडणवीस जोडी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवेल...

नागपुरात आगमन झाल्यावर नागपूरकरांनी मला पाच वेळा निवडून दिले. त्यांचे आभार, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र आणि विदर्भाला आता चिंता करण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या स्वागतासाठी केवळ नागपुरातीलच नव्हे तर अगदी शेवटच्या टोकावरील गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांतून देखील त्यांचे कार्यकर्ते आज सकाळीच विमानतळावर दाखल झाले होते. नंतर हे हजारो कार्यकर्ते विजयी मिरवणुकीत सहभागी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com