Officers Transfer News : Officers Pramotion  Sarkarnama
मुंबई

Officers Transfer News : प्रमोशन गेलं तरी चालेल, पण बदली नको रे बाबा; अधिकाऱ्यांनी पदोन्नती नाकारली, कारण काय?

Chetan Zadpe

Officers Transfer News : सरकारी नोकरीत रूजू असताना सरकारी नोकरदारांना सर्वाधिक धास्ती वाटते ती बदलीची. अनेक सरकारी अधिकारी बदली होण्याच्या शक्यतेनेच नाक मुरडताना दिसतात. मात्र आता नोकरीत पदोन्नती मिळत असतानाही केवळ बदली नको या कारणावरून काही अधिकाऱ्यांनी बदलीला रामराम ठोकला आहे. (Latest Marathi News)

आपल्याकडे चालून येत असलेली पदोन्नती गेली तरी चालेल पण बदली नको रे बाबा, असा पवित्रा काही सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील तब्बल १२ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पदोन्नतीला रामराम ठोकले आहे. या अधिकाऱ्यांनी केवळ आपली बदली होऊ नये, यासाठी नोकरीतील पदोन्नती नाकारली आहे. या १२ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बदली नाकारल्याने शासनाकडून त्यांची पदोन्नती रद्द करण्याचे आदेश काढण्यात आले. पदोन्नतीच्या ठिकाणी या संबंधित अधिकारी गैरहजर राहिल्याने अधिकाऱ्यांची पदोन्नती रद्द झाले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागातील ही बाब आहे. जिल्हा शल्य चिकित्सक संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नतीची संधी होती. केवळ बदली होऊ नये, यासाठी यांनी पदोन्नती नाकारली आहे. आत पदोन्नती रद्द करण्यात आल्याने या अधिकाऱ्यांचे आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणीचे लाभही रद्द करण्यात आले आहेत.

डॉ. प्रभास पाटील, डॉ अर्चना आखाडे, राहुल बुटे, डॉ. बालाजी माने, डॉ. उल्हास मेश्राम, डॉ. मनिषा केंद्रे, डॉ. संजय वराडे, डॉ.शहेबाज अब्दुल रज्जाक देशमुख, डॉ.पवन राऊत, डॉ. अविनाश येळणे, डॉ. संजय शिंदे. डॉ. विजया पलगे अशा या बारा अधिकाऱ्यांनी केवळ बदली नको म्हणून पदोन्नती नाकारली आहे.

अनेक अधिकाऱ्यांना एका विशिष्ट ठिकाणी काम करायचं असतं. सर्व साधन सुविधेची सहज उपलब्धता हे बदली नाकारण्याचं कारण आहे. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या मूळ गावापासून जवळच्या अंतरावर काम करायचं असतं, तर काही वेळेस कौटुंबिक कारणं, पाल्यांचं शिक्षण इत्यादी मुद्दे या बदली नाकरण्यामागे असू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT