मुंबई : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार, या केवळ चर्चा आहेत. राज्याचे प्रभारी एच. के. पाटील हे मंत्री झाल्यामुळे त्यांना बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे केवळ प्रभारी बदलेले जाणार आहेत. प्रभारी बदलल्यानंतर संघटनेत अनेक बदल होती. पण हे सर्व बदल माझ्याच नेतृत्वाखाली होणार आहेत, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. (It is only a talk that the state president of Congress will change : Nana Patole)
गेल्या काही दिवसांपासून प्रदेश काँग्रेसमध्ये (Congress) फेरबदल होणार, अशी चर्चा राज्यात रंगली आहे. त्यातच काही दिवासांपूर्वी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ दिल्लीत हायकमांडला भेटून आले. त्यात त्यांनी ‘काँग्रेस वाचवायची असेल तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना पदावरून हटवा’ मागणी केली होती. विदर्भातील नेत्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला गेले होते.
मुंबई काँग्रेसनंतर महाराष्ट्र (Maharashtra) काँग्रेस संघटनेतही भाकरी फिरविणार, अशी चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के . पाटील मुंबई दौऱ्यावर आहेत. दोन दिवस राज्यातील नेत्यांशी करणार आहेत. विदर्भातील नेत्यांनी नाना पटोले यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीतही अनेक नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष यांची भेट घेतली होती, त्यामुळे पटोले यांना पदावरून हटविण्याची चर्चा होत आहे. (Maharashtra Congress)
याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मला पदावरून हटविण्यात येणार ही फक्त चर्चाच आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही. महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील हे कर्नाटक सरकारमध्ये मंत्री झाले आहेत. त्यामुळे प्रभारी पाटील बदलले जाणार आहेत. मात्र, प्रभारी बदलल्यानंतर प्रदेश काँग्रेस संघटनेत अनेक बदल होतील. पण ते सर्व माझ्याच नेतृत्वाखाली होणार आहे.
नाना पटोले-सुशीलकुमार शिंदे वारीत चालणार
दरम्यान, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वारीत सहभागी होणार आहेत. सहकुटुंब हे नेते वारीत चालणार आहेत. येत्या २४-२५ जून रोजी वारीत भाग घेणार आहेत. वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते वारीत सहभागी होणार आहेत. (Maharashtra Congress)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.