Narendra Pawar Case | Padgha Police FIR Sarkarnama
मुंबई

Bhiwandi Crime : भिवंडीत भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल; दारू पाजून अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप

Former MLA Narendra Pawar : बापगावमधील खासगी मालमत्तेवर नेल्यानंतर तरुणीला शस्त्राचा धाक दाखवण्यात आला आणि त्यानंतर तिला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पिडीतेने केला आहे. तक्रारीनुसार, रात्री सुमारे दोन वाजता नरेंद्र पवार तेथून निघून गेले. त्यानंतर शैलेश पाटील यानेही तरुणीवर अत्याचार केला.

Jagdish Patil

Bhiwandi assault case : कल्याण शहरातील एका २२ वर्षीय विवाहित तरुणीने केलेल्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने दोघांवर गंभीर स्वरूपाचे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पीडित तरुणीचा पतीसोबत वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या उद्देशाने तिला नरेंद्र पवार यांच्या कार्यालयात बोलावण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी पवार आणि शैलेश पाटील यांनी तरुणीला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे नेल्याचा आरोप पिडीतेने केला आहे.

बापगावमधील खासगी मालमत्तेवर नेल्यानंतर तरुणीला शस्त्राचा धाक दाखवण्यात आला आणि त्यानंतर तिला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पिडीतेने केला आहे. तक्रारीनुसार, रात्री सुमारे दोन वाजता नरेंद्र पवार तेथून निघून गेले. त्यानंतर शैलेश पाटील यानेही तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने मदतीसाठी काँग्रेसच्या नगरसेविका व गटनेत्या कांचन कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. १६ सप्टेंबर रोजी तिने कुलकर्णी यांना संपूर्ण प्रकार सांगितला. तसेच घटनेशी संबंधित व्हिडिओ आणि मोबाईलवरील व्हॉट्सॲप चॅट असल्याचेही तिने दाखविल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कांचन कुलकर्णी यांनी पीडित तरुणीला सोबत घेत रात्री पडघा पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांच्याविरोधात सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल केला. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी पीडित तरुणीने केली आहे. अशा प्रकारामुळे आणखी किती महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असेल, असा सवालही तिने उपस्थित केला आहे.

कांचन कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, पीडित तरुणीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर संपर्क साधून मदतीची मागणी केली होती. प्रत्यक्ष भेटीत तिने सांगितलेली माहिती आणि तिच्याकडील कथित व्हिडिओ तसेच मोबाईल चॅट पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांच्या सूचनेनंतर पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT