Manoj Jarange : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडले, सरकारला 90 दिवसांची मुदत; शिष्टमंडळाकडून यशस्वी मध्यस्थी!

Manoj Jarange Patil Maratha Hunger Strike : मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. आज सकाळी सहा वाजता सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना भेटले.
Manoj Jarange Patil Ends Hunger Strike
Manoj Jarange Patil Ends Hunger Strikesarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange News : मुंबईकडे निघालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज सकाळी सहा वाजता सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात शिष्टमंडळाने आश्वासन दिले. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आहे. ते पुन्हा आंतरवाली सराटीकडे जाणार आहे. त्यांनी मुंबईला गेलेल्या मराठा आंदोलकांना पुन्हा परत येण्याचे आवाहन केले आहे.

शिष्टमंडळामध्ये मराठा उपसमितीचे प्रमुख, मंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुरेश धस तसेच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता. काल पासून जरांगे पाटील हे बीडमधील पाटोदा येथे मुक्कामी होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते.

जरांगे पाटील यांनी सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी 90 दिवसांची मुदत दिली आहे. आपण उपोषण स्थगित करतो मात्र आंदोलन सुरू राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पुढील 90 दिवसात सातारा गॅझेट लागू लागू, असा असे ते म्हणाले तसेच जर सरकारने धोका दिला आम्ही मुंबई गाठणार असा इशारा देखील त्यांनी दिला.

Manoj Jarange Patil Ends Hunger Strike
Manoj Jarange Patil : 'ना प्रमाणपत्रांचे वाटप, ना शिबीर, दवंडी', मग शिष्टमंडळ अंतरवालीत आले कशासाठी? मनोज जरांगे पाटील आक्रमक!

मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी ही 58 लाख नोंदीनुसार प्रमाणपत्राचे वाटप करावे आणि प्रमाणपत्रानंतर लगेच व्हॅलिडीटी सुद्धा द्यावी अशी होती. त्या विषयी जरांगे पाटील म्हणाले की, हैद्राबाद गॅझेटचा सुधारीत जीआर काढावा, तसेच 58 लाख नोंदीमधील एकही नोंद कमी होता कामा नये. सातारा, कोल्हापूर, औंध गॅझेटीअर लागू करा, असे देखील ते म्हणाले.

Manoj Jarange Patil Ends Hunger Strike
Manoj Jarange: शिष्टमंडळाशी चर्चेनंतरही जरांगेंची माघार नाहीच! 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा; सातारा-कोल्हापूर गॅझेटचा 'जीआर'साठी दिला अल्टिमेटम

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com