Devendra Fadanvis|
Devendra Fadanvis| 
मुंबई

Maharashtra Politics : 'माझ्यासोबत झालेल्या बेईमानीचा मी बदला घेतला'

अनुराधा धावडे

BJP-Shivsena Politics| मुंबई : ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) माझ्या आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. तेव्हापासून आम्ही फक्त संधी शोधत होतो. उद्धव ठाकरेंच्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी आम्ही तयारच होतो, असा धक्कादायक खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून बाहेर पडायचे असल्याचे आम्हाला कळले. त्यांनी आमच्याशी संपर्क साधला, आम्ही त्यांना पाठिंबा दिला. आमच्यासोबत जी बेईमानी झाली, ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी माझ्या आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला होता. तेव्हापासून आम्ही संधीच्याच शोधत होतो. आम्ही संत नाही, आम्ही नेते आहोत. आमच्याशी बेईमानी केली तर आम्ही त्याला उत्तर देणारच. माझ्यासोबत झालेल्या बेईमानीचा मी बदला घेतला, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितले की, तुम्ही लोक बाहेर पडणे हे चांगले आहे, आम्हालाही आमचा बदला घ्यायचा आहे. त्यानंतर अनेक घडामोडींनंतर राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले. पण सरकार स्थापनेचे संपूर्ण श्रेय उद्धव आणि आदित्य जी यांना द्यावे लागेल, शिंदे यांच्याशी केलेल्या वागणुकीमुळे शिंदे यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर भाजपने सरकार स्थापन करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यावर प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्रीपदावर आल्यानंतर तुम्ही सरकारमध्ये दुसरे कोणतेही पद घेतल्यास तुम्ही सत्तेचे भुकेले आहात, अशी तुमची प्रतिमा बनते. मात्र आपण खुर्चीसाठी नव्हे, तर परिवर्तनासाठी सत्ता बदलली आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन ते अडीच वर्षांत घडलेल्या घटना पाहता हा बदल करण्यात आला आहे. म्हणूनच मी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, पण माझ्या पक्षाच्या नेत्यांनी मला समजावून सांगितले की महाराष्ट्रात सरकार चालवायचे आहे आणि त्यासाठी माझी गरज आहे, म्हणून मी हो म्हणालो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT