Andheri By Poll Election मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा आज (६ नोव्हेंबर) निकाल लागणार आहे. ३ नोव्हेंबरला रोजी या जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी दिली होती.
तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विनंतीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर भाजपाने आपला उमेदवार या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे या मतदार संघासाठी ऋतुजा लटके विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
तरीही या जागेसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, ज्यामध्ये ऋतुजा लटके यांच्याशिवाय अन्य सहा उमेदवारांचा समावेश होता. अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान पार पडले. मतदारांनीही वेळेत आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडले. भाजपने (BJP) निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर निवडणूक होणार नाही, असेच मतदारांना वाटत होते. त्यामुळे शिवसेना (shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना प्रचार करताना निवडणूक होणार आहे, असाच प्रचार करावा लागला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.