Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis sarkarnama
मुंबई

फडणवीसांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची कबुली ; ठाकरेंचे प्रत्युत्तर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा काल (शनिवारी) शुभारंभ केला. त्यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि त्यांच्या गटातील शिवसेनेची खिल्ली उडवली. त्याला शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ठाकरे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मते मागत आहेत. मोदी युग संपल्याचे हे लक्षण आणि कबुली आहे. ही भाजपची परंपरा आहे. नाव वापरा. मग नवीन नाव शोधा. आणि मग त्या नावाने मते मागायला सुरुवात करा आणि सत्ता मिळवा. हाच भाजपचा खरा चेहरा आहे, जो देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणला आहे. याचे योग्य उत्तर महाराष्ट्रातील जनता आपल्या मताधिक्याने देईल,"

षण्मुखानंद सभागृहात झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाषण करताना, आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवायची आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यावर उद्धव म्हणाले, फडणवीस यांचे हे वक्तव्य बघता, आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच त्यांनी एकप्रकारे अधोरेखित केले. मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आहे,

षण्मुखानंद सभागृहात आयोजित सभेत फडणवीस म्हणाले होते, 'तुमचं सरकार आल्यानंतर काय होतंय ते तुम्ही पाहत आहात. दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येणारे सर्व सणही याच पद्धतीने साजरे केले जातील. आजचे मुख्यमंत्री घरात बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरात बसू देणार नाहीत. ते गेल्या वेळीच भाजपचे महापौर होऊ शकले असते. आम्ही जास्त जागा जिंकल्या होत्या. पण मैत्रीपूर्ण बाजू सांभाळण्यासाठी आम्ही त्याग केला. यावेळी मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना युतीचा महापौर होणार आहे. पण कोणती शिवसेना? शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT