Ashish Shelar : बाळासाहेबांचे स्वप्न इतरांनी पुर्ण केले म्हणून त्यांच्या मुलांनी एवढे चिडावे का?

Ashish Shelar : "आपल्या वडिलांच्या विचारांनी झपाटून समाजातील लोक, आयुष्य खर्च करुन आपल्या वडिलांचे स्वप्न पुर्ण करतात. याचा, त्यांच्या सुपुत्रांना आनंदच व्हायला हवा ना?"
Ashish Shelar, Uddhav Thackeray
Ashish Shelar, Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : भाजपचे नेते, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी यापूर्वी ट्विटरवरून शिवसेनेवर (shiv sena) निशाणा साधला होता. भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे... आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय, भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत. लवकरच, मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत "करुन दाखवतील" आमचं ठरलंय!! असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं होतं.

आता पुन्हा त्यांनी टि्वट करीत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शुक्रवारी भाजपने थेट आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत दहीहंडीवेळी शक्तीप्रदर्शन केलं.शेलारांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे की हिंदुत्वाचा ज्वलंत विचार जगणाऱ्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न त्यांच्या मा. सुपुत्रांना पुर्ण करण्यास नाही जमले. म्हणून त्यांना वंदनीय मानणाऱ्यांनी ते पुर्ण करु नये का? ते इतरांनी पुर्ण केले म्हणून त्यांच्या मुलांनी एवढे चिडावे का?

Ashish Shelar, Uddhav Thackeray
Tejahswi Yadav : उपमुख्यमंत्र्यांनी 'या' सहा टिप्स् फॉलो करण्याचा मंत्र्यांना दिला कानमंत्र

"आपल्या वडिलांच्या विचारांनी झपाटून समाजातील लोक, आयुष्य खर्च करुन आपल्या वडिलांचे स्वप्न पुर्ण करतात. याचा, त्यांच्या सुपुत्रांना आनंदच व्हायला हवा ना?" असा थेट सवाल करत शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

"पेला अर्धा भरला आहे, असेही म्हणता येते पेला अर्धा रिकामा असेही म्हणता येते. फक्त भरला आहे, म्हणायला मोठे मन लागते. उरला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पर्व संपत आले म्हणून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव भाजप वापरते असे जे मा. सुपुत्रांना वाटतेय. हे म्हणजे अती झाले आणि हसू आले. पण काय करणार? आपण घरात बंद खोलीत बसून राहिलो की, बाहेरचे विशाल जग संपल्यासारखे वाटायला लागतेच," असा टोलाही शेलार यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com