Devendra Fadnavis is upset Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis is upset: मुख्यमंत्र्यांसोबतचे व्यासपीठ सलग दुसऱ्या दिवशी फडणवीसांनी टाळले !

Maharashtra Politics: काल राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रामंध्ये शिवसेनेची मोठी जाहिरात आली होती.

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadnavis is upset: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (१३ जून) सर्व दौरे रद्द केले होते. आजही ( १४ जून) त्यांचे सर्व दौरे रद्द केले आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे देवेंद्र फडणवीस अजूनही नाराज आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मंगळवारी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत कोल्हापूर दौऱ्यावर जाणार होते. पण त्यांनी मंगळवारी अचानक त्यांचे दौरे रद्द केले. यामुळे मंगळवारी प्रकाशित झालेल्या जाहिरात प्रकरणावरुन फडणवीस अजूनही नाराज आहेत. अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रामंध्ये शिवसेनेची मोठी जाहिरात आली होती. या जाहिरातीत फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे यांना राज्यातील जनतेची सर्वाधिक पसंती असल्याचं दाखवण्यात आलं. इतकेच नव्हे तर या जाहिरातीत फडणवीसांचा (Devendra Fadanvis) साधा फोटोही नव्हता. त्यानंतर विरोधकांनी धारेवर धरल्यानंतर आज (१४ जून) पुन्हा जाहिरात देण्यात आली. आजच्या जाहिरातीत जरी त्याचा फोटो असला तरी फडणवीस अजूनही नाराजच असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. याच कारणाने त्यांनी जाणीवपूर्वक मुंबईतील कार्यक्रमाला जाणं टाळल्याचं दिसत आहे.

एमएसआरडीसी'च्या स्थापनादिनानिमित्त आज मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर फडणवीस यांचं नावही होतं. पण फडणवीसांच्या वेळापत्रकात मात्र या कार्यक्रमाचा उल्लेखही नव्हता. त्यामुळे शिवसेनेने काल दिलेल्या जाहिरातीमुळे फडणवीस नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांच्या कानाला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी मोठा आवाज असलेल्या कार्यक्रमात न जाण्याचा आणि विमान प्रवासही टाळण्याचा सल्ला दिला आहे. अशी माहिती काल फडणवीस यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली होती. (Shivsena Advertising )

दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार होता. पण ऐनवेळी फडणवीसांनी आपला दौरा रद्द केला. त्यांच्या कानाला दुखापत झाल्याने त्यांनी हा दौरा रद्द केल्याचं त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं. आज सह्याद्री अतिथीगृहावर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. पण एमएसआरडीसी च्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार नाहीत. अशीही माहिती आहे. (Maharashtra Government)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT