Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  
मुंबई

कोरोनाची लागण होऊनही फडणवीस अॅक्शन मोडमध्ये; राज्यसभेच्या बैठकीला उपस्थित राहणारच

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च ट्वीटरवरुन याबाबतची माहिती दिली आहे. सध्या ते गृहविलगीकरणात आहेत. त्याचबरोबर, आपल्या संपर्कात आलेल्यांनी त्वरीत तपासणी करुन घेण्याचे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. (Rajysabha Elelction latest news)

दरम्यान, राज्यसभेसाठी येत्या 10 जूनला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीला ते उपस्थित राहणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे असतानाही राज्यसभेसाठी देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये असून आज होणाऱ्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.

केंद्रीय रेल्वेमंत्री आणि राज्यसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील प्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासोबत आज दुपारी चार वाजता बैठक होणार आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात, अश्विनीकुमार वैष्णव, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस ऑनलाइन पद्धतीने बैठकीत सहभागी होणार आहेत. तर साडेचार वाजता दुसरी बैठक होणार आहे. या बैठकीसाठी गिरीश महाजन, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय उपस्थित राहणार आहेत. या बैठकीतही फडणवीस ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावतील, असे समजते.

गेल्या दोन दिवसांपासून फडणवीस यांना ताप येत होता. ते काल लातूरला होते. तेथून ते सोलापूरला जाणार होते. मात्र सोलापूर दौरा रद्द करुन फडणवीस मुंबईला परतले. मुंबईला आल्यावर त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीबाबत दोन दिवसांपुर्वी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी फडणवीस यांची त्यांच्या सागर या बंगल्यावर भेट घेतली होती.

छगन भुजबळ, सुनील केदार, अनिल देसाई हे या बैठकीला उपस्थित होते. आज (५ जून) संध्याकाळी राज्यसभेसंदर्भातली बैठक आहे. त्या बैठकीला फडणवीस उपस्थित राहणार नाहीत, असे सुत्रांनी सांगितले होते. गेल्या चोवीस तासांत देशात कोरोनाच्या एकूण तीन हजार 962 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, शुक्रवारी चार हजार 41 रुग्णांची नोंद करण्यात आली. देशातील दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक रुग्ण केरळमधील आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT