Devendra Fadanvis, Nawab Malik
Devendra Fadanvis, Nawab Malik sarkarnama
मुंबई

'दिल्लीच्या साथीने सेना संपविण्याचे फडणविसांचे राजकारण`

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

मुंबई : ''दिल्लीच्या सहकार्याने देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपवण्याचे राजकारण केले. मात्र, आता त्यांना शिवसेना काय आहे हे समजू लागल्याने अशाप्रकारची विधाने ते करत आहेत,'' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.

''पाच वर्षाचा निकाल पाहिला तर, भाजपमुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी २५ वर्षे युतीत सडलो असे विधान केले आहे. मात्र, आता शिवसेनेची ताकद वाढताना दिसत आहे. आता जे नगरपालिकांचे निकाल आले त्यावरुन भाजपसोबत राहिल्याने कमकुवत झालेल्या शिवसेनेचा ग्राफ कितीतरी पटीने वाढलेला दिसला,'' असेही नवाब मलिक म्हणाले.

''बाळासाहेबांनी युतीचा निर्णय घेतला होता. शिवाय हयातीत युतीतून बाहेर पडण्याचा विचारही केला होता. आम्ही कॉंग्रेससोबत असताना सेनेकडून राष्ट्रवादीसोबत आली पाहिजे हा प्रस्ताव होता. परंतु, काही कारणामुळे जमले नाही,'' असेही नवाब मलिक यांनी सांगितले. ''२०१९ च्या आधीपासून भाजपसोबत खच्चीकरण होतेय ही चर्चा सुरू होती. भाजप ज्या पक्षांसोबत युती करतो त्यांचे खच्चीकरण करतो हे सेनेला अगोदरच कळले होते. त्यामुळे सेनेने भूमिका घेऊन भाजपला बाजूला केले,'' असेही नवाब मलिक म्हणाले.

''सेनेसोबत असताना भाजप मोठी झाली हे आता देवेंद्र फडणवीस यांना समजले आहे. परंतु, आठ वर्षापासून देवेंद्र फडणवीस सेनेला संपवण्याचे राजकारण करत होते,'' असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT