Case of fake MLA in Mumbai: पोलिस, अधिकारी असल्याचे भासवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो. पण आता एका व्यक्तीने थेट आपण आमदार असल्याचे भासवत सवलती घेत, टोल चुकवत सरकारची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तोतया आमदाराच्या विरुद्ध वडाळा टी टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एका दक्ष नागरिकाच्या सतर्कमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या तक्रारीवरुन मानव व्यकंटेश मुन्नास्वामी या तोतया आमदाराविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय कायदा आणि भारताचे राज चिन्हाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
चौकशीसाठी मानवला समन्स बजाविण्यात आले आहे. पोलिसांकडून त्याची लवकरच चौकशी होणार आहे. त्याला जाब विचारण्यात येणार आहे. तीन दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. मानव व्यकंटेश मुन्नास्वामी याने आपल्या दोन खासगी कारवर आमदार असल्याचा लोगो लावून सरकारची फसवणूक केली आहे.
बाबूराव गंगाराम सुलम (वय ५९) यांनी 7 सप्टेंबरला वडाळा टी टी पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार करुन मानव मुन्नास्वामी यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची गंभीर दखल वरिष्ठ पोलीस अधिकान्यांनी घेतली आहे. सुलम यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बाबूराव गंगाराम सुलम हे वडाळ्यातील अॅण्टॉप हि, पर्णकुटी सोसायटीमध्ये राहतात. ते बेस्ट कंपनीतून निवृत्त झाले असून मुंबई तेलगू संघ या संस्थेचे अध्यक्ष आहे. ही संस्था सामाजिक कार्य करत असून त्यांच्या संस्थेची धर्मादाय आयुक्त येथे नोंद आहे.
सायन-प्रतिक्षानगर परिसरात संस्थेचे एक कार्यालय आहे. संस्थेत एकूण नऊ सभासद आहेत. मानवं मुन्नास्वामी हा 2020-23 या कालावधीत संस्थेत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होता. सध्या त्याचा संस्थेशी काहीही संबंध नाही, तो कुठल्याही पदावर नसल्याचे सुलम यांनी सांगितले आहे.
इनोव्हा क्रिस्टर आणि मारुती सुझुकी व्हॅगनार या दोन्ही कारचा मानव वापर करतो. तो राज्य सरकारच्या कोणत्याही पदावर नाही. तो लोकप्रतिनिधी नसून महाराष्ट्र विधान मंडळाच्या विधानसभा किंवा विधानपरिषद या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही सभागृहाचा सभासद नाही. तरीही तो त्याच्या वाहनावर विधानसभा सदस्य असल्याचा लोगो लावतो. या लोगोच्या मध्यभागी अशोकस्तंभ आहे.
आपल्या वाहनांवर लोकप्रतिनिधींच्या सरकारी वाहनांवर असतात त्या प्रकारची महाराष्ट्र शासन असे पांढऱ्या रंगाच्या पाटीवर लाल रंगामध्ये लिहिलेली पाटी लावतो. हा प्रकार संशयास्पद वाटताच बाबूराम सुलम यांनी त्यांच्या दोन्ही वाहनांचे फोटो काढले होते. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याची चौकशी करणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.