Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion 
मुंबई

वडील राज्यात मंत्री तर मुले खासदार अशा तीन जोड्या; भाजपमध्येही घराणेशाही!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. यावेळी भाजप (BJP) आणि शिंदे गट (Eknath Shinde) या दोन्ही बाजूंनी ९-९ असे एकूण १८ मंत्री शपथबद्ध झाले. या मंत्रिमंडळात भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीष महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे. या विस्तारात भाजपला घराणेशाहीचे वावडे नसल्याचे दिसून आले. वडील मंत्री आणि मुलगा किंवा मुलगी खासदार अशा दोन जोड्या भाजपमध्ये आज दिसून आल्या. तिसरी जोडा शिंदे गटाकडे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत हा सुद्धा खासदार आहे.

नव्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे-पाटील आणि विजयकुमार गावित यांनीदेखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता राज्याच्या राजकारणात वडील मंत्री आणि मुलगा खासदार असे चित्र दिसून आले आहे.

कॉंग्रेसमध्ये विरोधी पक्षनेतेपदी असतानाच राधाकृष्ण विखे पाटील यांचे फडणवीस यांच्यांशी चांगले संबंध निर्माण झाले. २०१९ मधील राजकीय घडामोडींनंतर गेल्या निवडणुकीत ते भाजपमध्ये दाखल झाले. अल्पावधीतच त्यांनी भाजपच्या राज्य ते देश पातळीपर्यंतच्या नेत्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. त्यांचे चिरंजीव भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून केंद्रातही मोठा संपर्क वाढविला.

त्याचप्रमाणे विजयकुमार गावित यांनाही नव्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागल्याने नंदूरबारमध्ये सध्या जल्लोषाचे वातावरण आहे. विजयकुमार गावित हे महाराष्ट्राच्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. या पुर्वीच्या सरकारमध्ये ते वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन ह्या खात्यांचे मंत्री होते.

नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून डॉ. गावित हे यापूर्वी सलग सहा वेळेस निवडून येण्याचा त्यांनी विक्रम केला आहे. ते दीर्घकाळ मंत्रीपदावरही राहिले. त्यांचे जुने विरोधक काँग्रेस नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे २०१९ च्या निवडणूकत त्यांनी एकहाती विजय मिळवला. त्यानंतर आता नव्या मंत्रिमंडळात त्यांची थेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने नंदूरबारमध्ये सध्या जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यांच्या कन्या हिना या नंदुरबारच्या खासदार आहेत. त्यामुळे गावितांची घराणेशाही भाजपने पुढे चालवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT