Kishor Patil : चुलत बहिण ठाकरे गटात गेली तरीही बंडातील आक्रमकपणा कायम

आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत पाचोरा येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार
MLA Kishor Patil with supporters
MLA Kishor Patil with supportersSarkarnama
Published on
Updated on

पाचोरा : शिवसेनेच्या (Shivsena) अस्तित्वासाठीच आम्ही मोठ्या संख्येने पक्षांतर्गत उठाव केला असून, आम्ही बंडखोर (Rebel) व गद्दार नाहीत, शिवसेना संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून राज्यकारभार करणाऱ्यांनी गद्दार कोण? याचा अंदाज घ्यावा, असे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी सोमवारी पाचोरा येथे आयोजित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी केले. किशोर पाटील यांच्या भगिनी या शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्यातरी पाटील यांनी आपला आक्रमकपणा कायम ठेवला आहे. (we have taken rebel step in the interest of Shivsena)

MLA Kishor Patil with supporters
Jalgaon News: मंत्रीपदासाठी खानदेशच्या नेत्यांचे एकनाथ शिंदेकडे लॅाबिंग

शिवालय या संपर्क कार्यालयात आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झालेले व शिंदे गटाचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुकाप्रमुख सुनील पाटील (सरपंच जारगाव) व युवा सेनेचे तालुकाप्रमुख योगेश पाटील (सरपंच शेवाळे) यांचा सत्कार करण्यात आला.

MLA Kishor Patil with supporters
Dada Bhuse: एकनाथ शिंदे यांनी दादा भुसेंना दिले मैत्रीचे गिफ्ट!

याप्रसंगी बोलताना आमदार किशोर पाटील यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले, की मागील दोन महिन्यात राज्यात अचानक झालेल्या राजकीय घडामोडींमुळे जनतेत, पदाधिकाऱ्यांत आणि मतदारसंघात संभ्रम निर्माण झाला होता. मी शिंदे गटात का सामील झालो याचे स्पष्टीकरण मागील काळात देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षाच्या सोबत शिवसेनेने आणि शिवसैनिकांनी सतत वीस-पंचवीस वर्षे राजकीय संघर्ष केला आणि त्याच पक्षांसोबत उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी करून आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

अडीच वर्षांच्या काळात शिवसेना संपत होती. विकासकामांचा जास्त वाटा राष्ट्रवादीकडे जात होता. शिवसेना बाळासाहेबांच्या विचारधारेपासून लांब जाताना दिसत होती. अशा अनेक कारणांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पन्नास आमदारांनी शिवसेना वाचविण्यासाठी बंड नव्हे तर उठाव केला. आम्हाला बंडखोर म्हणतात. परंतु सत्तेसाठी शिवसेना संपविणाऱ्या पक्षांसोबत मांडीला मांडी लावून बसले. मग खरे गद्दार कोण? असा आरोप आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरे गटावर केला. जनतेने मला दुसऱ्यांदा आमदार केले. मी गटातटाचे राजकारण केले नाही. मतदारसंघाची सर्व जनता माझ्यासोबत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिंदे गटाचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनीही आपली भूमिका मांडून आमदार किशोर पाटील यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पद्मसिंग पाटील, संजय पाटील (भडगाव), शिवदास पाटील, अविनाश कुडे, गनी शेठ, गणेश पाटील, किशोर बारावकर, राजेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचलन गणेश पाटील यांनी केले. प्रवीण ब्राम्हणे यांनी आभार मानले.

‘रावसाहेबांची निष्ठा दीड महिन्यात संपुष्टात’

दरम्यान, शिंदे गटात सामील झालेल्या व जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त झालेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी गेल्या दीड महिन्यांपूर्वी महादेव मंदिरात शपथ घेऊन भाजपवर टीका करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा संकल्प केला होता. तसेच शिवाजी महाराज चौकात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मनोगत व्यक्त करून शिंदे गटात गेलेल्यांवर टीका केली होती व आपण शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु रावसाहेब पाटील यांची निष्ठा अवघ्या दीड महिन्यात संपली, असा आरोप उपजिल्हाप्रमुख ॲड. अभय पाटील यांनी केला आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com