Uddhav Thackeray & Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

अखेर ठरलं! 'या' दिवशी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार...

Uddhav Thackeray & Eknath Shinde : सध्या तरी दोन्ही नेत्यांमधून विस्तवही जात नाही. परंतू...

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray & Eknath Shinde News : उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसह बाहेर पडले होते. यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. नंतर भाजपसोबत जात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले होते. यानंतर दोन्ही नेत्यांकडून वारंवार एकमेकांवर टीकेचे बाण सोडले जातात.सध्या तरी दोन्ही नेत्यांमधून विस्तवही जात नाही. परंतू आता ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण येत्या 23 जानेवारीला होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.

हिवाळी विधिमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, यावेळी शिंदे आणि फडणवीस हे दोघेही सभागृहात हजर नव्हते. मात्र, आता विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन, ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेय या कार्यक्रमाचे रीतसर आमंत्रण देखील उध्दव ठाकरेंना पाठविण्यात आलं आहे. दरम्यान, ठाकरेंनी हे आमंत्रण स्वीकारले की नाही याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. पण जर हे निमंत्रण उध्दव ठाकरेंनी स्वीकारले तर प्रथमच ठाकरे आणि शिंदे हे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT