Maharashtra Budget  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Budget : शिक्षण सेवकांना बंपर लॉटरी; फडणवीसांच्या घोषणेने मिळणार बूस्टर

Devendra Fadnavis : शिक्षणसेवकांच्या मानधनात किती वाढ झाली?

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पादरम्यान अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये शिक्षण सेवकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. त्यामुळे शिक्षण सेवकांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात जवळपास दुप्पट वाढ करण्याचा निर्णय आज शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे शिक्षण सेवकांना बंपर लॉटरी लागली असून त्यांना बूस्टर मिळणार आहे.

शिक्षणसेवकांच्या मानधनात किती वाढ झाली?

- प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवकांचे मानधन सहा हजार रुपयांवरून आता १६ हजार रुपये करण्यात आले आहे.

- माध्यमिक शिक्षणसेवकांचे मानधन आठ हजार रुपयांवरून आता १८ हजार रुपये करण्यात आले आहे.

- उच्च माध्यमिक शिक्षणसेवकांचे मानधन नऊ हजार रुपयांवरून २० हजार रुपये करण्यात आले आहे.

दरम्यान, आपल्या मानधनामध्ये वाढ होण्यासाठी शिक्षकसेवकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. यासाठी अनेकवेळा त्यांनी आंदोलनही केली. मात्र, आता त्यांच्या मागणीला यश आले असून त्यांच्या मानधनामध्ये मोठी वाढ करण्यात आल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT