Maharashtra Budget
Maharashtra BudgetSarkarnama

Maharashtra Budget: महिलांसाठी खास सवलत; एसटीचा प्रवास आता अर्ध्या तिकिटात

Devendra Fadnavis: याअर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या.
Published on

Assembly Budget Session: राज्याचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. याअर्थसंकल्पादरम्यान अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या तिकीट दरामध्ये महिलांना आता 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्क्यांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाचा महिलांना प्रवास करताना फायदा होणार आहे.

Maharashtra Budget
Maharashtra Budget : शिक्षण सेवकांसह विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ; बस तिकिट दरात महिलांना 50 टक्के सवलत

या बरोबरच राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी' ही नवीन योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेत महिलांच्या आरोग्यासाठी आता 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या अभियानाची घोषणाही करण्यात आली आहे.

या अभियानामार्फत चार कोटी महिला आणि मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, बचत गटांच्या माध्यमातून 37 लाख ग्रामीण महिलांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com