Shiv Sena UBT district chief Omkar Patil faces legal trouble after police registered a case over alleged fraud involving a tribal complainant. Sarkarnama
मुंबई

Crime News : ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने घातला आदिवासींना गंडा; तब्बल 23 लाख उकळले

FIR Omkar Patil : तब्बल 100 हून अधिक आदिवसींची फसवणूक करणाऱ्या ओंकार पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

दिलीप पाटील

Palghar News : शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळवून देण्याच्या नावाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख ओंकार पाटील यांनी 100 हून अधिक गोरगरीब आदिवासींची फसवणूक करत लाखो रुपयांना गंडा घातल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधात वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी पालघरच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेल्या ओंकार पाटील आणि त्यांचा सहकारी कल्पेश वरठा यांनी वाडा, विक्रमगड, जव्हार, पालघर तालुक्यातील गोरगरीब आदिवासींना शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळवून देतो म्हणून सुमारे ११५ आदिवासींकडून प्रत्येकी २० हजार रुपये उकळत २३ लाखांना गंडा घातला.

सन २०२३- २०२४ मध्ये ओंकार पाटील आणि कल्पेश वरठा यांनी विविध आदिवासी गाव - पाड्यांमध्ये बैठका घेवून घरकुल मिळवून देण्याच्या आमिषाने अशिक्षित भोळ्याभाबड्या आदिवासींना पैसे देण्यास भरीस घातले.

वाडा तालुक्यातील वाडा, वरले, मांगरूळ विक्रमगड तालुक्यातील डोल्हारी, खांड, फुफाणेपाडा, दादाडे, धानी, सवादे, मोह – पैकी भिंबरपाडा, मोह पैकी धिंडेपाडा, टेटवाली, माले– साठेपाडा, उघाणीपाडा, आलोंडे, सातकोर, उपराळे, आपटी खुर्द, ठाकूरपाडा,तांबडमाळ, भोपोली , बोरांडा, शीळ, वरठेपाडा, सारशी, चिंचघर, वेहेळपाडा, जव्हार तालुक्यातील अडखड , वाळवंडा, पालघर तालुक्यातील तामसई, नांदगाव आदी गावातील सुमारे ११५ आदिवासींनी घरकुल मिळेल या आशेने ओंकार पाटील आणि कल्पेश वरठा यांना प्रत्येकी २० हजार रुपये दिले.

मात्र एकाही आदिवासीला घरकुल मिळाले नसल्याने आपण फसवलो गेलोय याची जाणीव झाल्यावर त्यांनी पाटील व वरठा यांच्याकडे आपले पैसे परत मिळावेत म्हणून तगादा लावला. मात्र त्यांनी ह्या आदिवासींना पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्याने अखेर या आदिवासींनी वाडा पोलिस ठाण्यात ओंकार पाटील आणि कल्पेश वरठा यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आला.

दरम्यान, आरोपींनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनाकरिता अर्ज केला होता. त्यावेळी हा जामिन अर्ज फेटाळल्याने आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांना अंतरिम जामीन देण्यात आल्याची माहिती आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक राजकुमार मुंडे हे करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT