Eknath Shinde and Devendra Fadanvis Sarkarnama
मुंबई

Maharashtra Government : सरकारी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारचा फटका ? ; आज निर्णय होणार

Maharashtra Government : पूर्वीप्रमाणे सहा दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेत फूट पाडून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर या सरकारने ठाकरे सरकारने घेतलेले अनेक निर्णय बदलण्याचा सपाटा लावला आहे. शिंदे-सरकारने (eknath shinde) ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णय रद् केले, किंवा ते स्थगित केले आहेत. (eknath shinde latest news)

उद्धव ठाकरे सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा पाच दिवसांचा केला होता. या निर्णयात बदल करून पुन्हा पूर्वीप्रमाणे सहा दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

सोमवार ते शुक्रवार असा पाच दिवसांचा आठवडा ठाकरे सरकारने केला होता. मात्र, या निर्णयामुळे शासकीय कामकाजावर प्रचंड परिणाम झाला होता. कामाचे तास कमी झाले होते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सहा दिवसांचा आठवडा करीत दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT