BJP corporator Vishal Pavshe joins Shiv Sena
BJP corporator Vishal Pavshe joins Shiv Sena sarkarnama
मुंबई

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंचा भाजपला पुन्हा धक्का...

सरकारनामा ब्यूरो

कल्याण : काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivali) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपला (BJP) पुन्हा धक्का दिला आहे. दोन महिन्यांपूर्वी भाजपच्या तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या धक्क्यातून सावरतो न सावरतो तोच शिवसेनेने (shivsena) पुन्हा आणखी एका नगरसेवकाला गळाला लावत भाजपला धक्का दिला आहे.

कल्याण-डोंबिवली भाजपचे माजी नगरसेवक विशाल पावशे यांनी (आज ता.९) पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात आयोजित कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला. भाजपचे आणखी काही नगरसेवक शिवसेना, राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकंदरीतच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरून भाजपने शिवसनेनेवर आरोप केले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले होते. त्यातच गेल्या दोन महिन्यात भाजपचे चार नगरसेवक शिवसेनेने गळाला लावल्याने भाजपला शह दिला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असलेले बॅनर ठाणे शहरात ता. ७ फेब्रुवारी झळकले होते. ही गोष्ट शिंदे यांना समजल्यानंतर त्यांनी स्थानिक नगरसेवक राम रेपाळे यांच्याशी संपर्क साधून 'भावी मुख्यमंत्री' शब्द वगळा, असा आदेश दिला. त्यानुसार ते शब्द वगळण्यात आले आहेत. अशा प्रकारचे बॅनर विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर लागले होते, त्यानंतर पुन्हा तोच उल्लेख असलेले बॅनर लागल्याने राज्यभर चर्चेला उधाण आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT