शिंदे पितापुत्रांची खिरखंडीतील मुलींसाठी यांत्रिक बोट

खिरखंडी Khirkhindi गावातून कोयना Koyana जलाशय Back water पार करत पुन्हा अंधारीपर्यंत चार पाच किलोमीटरचा घनदाट जंगलातील प्रवास करत या मुली शाळेत पोहोचत होत्या.
MP Shrikant Shinde, Minister Eknath Shinde
MP Shrikant Shinde, Minister Eknath ShindeKaas reporter
Published on
Updated on

कास : खिरखंडी (ता. जावली) येथील मुलींच्या शिक्षणासाठीची धावपळ व विदारक परिस्थिती सर्वांच्या समोर आल्यानंतर प्रशासनासह सर्वजण कामाला लागले. पण, असुरक्षित अशी लाकडाची होडी चालवत या मुली येत असल्याने या मुलींना बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वखर्चाने रोज कोयना जलाशय पार करण्यासाठी यांत्रिक बोट उपलब्ध करून दिली आहे. आज पहिल्यांदाच या मुलींनी या यांत्रिक बोटीतून प्रवास करत शाळा गाठली.

खिरखंडीतील मुलींच्या शिक्षणाबाबतची दुरवस्था सोशल मीडीयावर मांडली होती. या वृत्तानंतर या विषय माध्यमांनी उचलून धरल्याने मुंबई उच्च न्यायालयाला ही या मुलींची दखल घ्यावी लागली. दुर्गम बामणोली खोऱ्यातील खिरखंडी गावातून कोयना जलाशय पार करत पुन्हा अंधारीपर्यंत चार पाच किलोमीटरचा घनदाट जंगलातील प्रवास करत या मुली शाळेत पोहोचत होत्या.

MP Shrikant Shinde, Minister Eknath Shinde
एकनाथ शिंदे-जितेंद्र आव्हाड जोडीने केले भाजपचे बालेकिल्ले उद्‌ध्वस्त!

ही परिस्थिती पाहून नुकतेच आपल्या मूळ दरे या गावी आलेल्या मंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ या मुलींना रोज शाळेत कोयना जलाशय पार करून सकाळी आणि संध्याकाळी सोडणे यासाठी एक यांत्रिक बोटी उपलब्ध करून दिली.

MP Shrikant Shinde, Minister Eknath Shinde
चर्चा तर होणारच : एकनाथ शिंदे जुन्या मैत्रीला जागले..

खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्यक्ष खिरखंडीला भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या या कामामुळे मुलींचा रोजचा होडी चालवण्याचा त्रास कमी झाला आहे. जिल्हा प्रशासनाने मुलींना फायबर बोट उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लाइफ जॅकेट उपलब्ध करून दिली आहेत. पण, सर्वांच्या अगोदर यांत्रिक बोट उपलब्ध करून दिल्याने या मुलींची मोठी अडचण दूर झाली आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com