Ashok Chavan and Rahul Gandhi Sarkarnama
मुंबई

Congress Working Committee: काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांचे वजन पुन्हा वाढले; वर्किंग कमिटीवर निवड करून महत्त्व अधोरेखित

Ashok Chavan : काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी पक्षाच्या वर्किंग कमिटीची घोषणा केली. या कमिटीमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे चव्हाणांचे पक्षातील महत्व आणखी वाढले आहे.

काँग्रेसच्या थेट राष्ट्रीय कार्यकारिणीमध्येच महाराष्ट्रातून अशोक चव्हाणांना स्थान देण्यात आल्यांतर चव्हाणांनीही ट्वीट करत 'हायकमांड'चे आभार मानले आहेत. पक्षाने सोपवलेली जबाबदारीच माझ्यासाठी मोठा सन्मान असून मी या सेवेसाठी आभारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाण भाजपात जाणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात काही दिवसांपूर्वी होत्या. मात्र, त्यानंतर त्यांनी स्वत: स्पष्टीकरण देत आपण काँग्रेसमध्येच असून कुठेही जाणार नसल्याचे सांगितले होते. यानंतर आता पक्षाने अशोक चव्हाण यांना थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करत पक्षातील त्यांचे स्थान आणखी मजबूत केले आहे.

काय आहे अशोक चव्हाणांचे ट्वीट ?

"काँग्रेस वर्किंग कमिटीचा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खरोखरच सन्मानित आणि मनापासून कृतज्ञ आहे. ही जबाबदारी मी अत्यंत नम्रतेने स्वीकारत असून काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण देशाच्या भल्यासाठी अथक परिश्रम करण्यास वचनबद्ध आहे".

"काँग्रेस पक्षाची मूल्ये आणि तत्त्वे जपण्यासाठी आणि त्याच्या वाढीसाठी आणि यशात योगदान देण्यासाठी मी पूर्णपणे समर्पित आहे. पुढे असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि आपल्या देशाच्या उज्वल भविष्याकडे मार्गक्रमण करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे", अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी ट्वीट करत दिली आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT