Delhi News : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या वर्किंग कमिटीची घोषणा केली आहे. या कमिटीमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि खासदार राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या कमिटीमध्ये महाराष्ट्रातून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण मुकुल वासनिक यांचा समावेश करण्यात आला आहे. तर रजनीताई पाटील, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर यांचा निमंत्रित म्हणून यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
काँग्रेस कार्यकारिणीत ३९ सदस्य, ३२ स्थायी निमंत्रित आणि नऊ विशेष निमंत्रितांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातून काँग्रेस कार्यकारिणीत मुकुल वासनिक आणि अशोक चव्हाण यांना संधी देण्यात आली. तर अविनाश पांडे हे महासचिव, रजनीताई पाटील आणि माणिकराव ठाकरे प्रभारी म्हणून समितीवर असणार आहेत.
चंद्रकांत हंडोरे निमंत्रित म्हणून समितीवर असणार आहेत. याबरोबरच यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे यांना विशेष आमंत्रित म्हणून संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, तरीही त्यांचाही या कमिटीत समावेश करण्यात आला आहे.
काँग्रेस वर्किंग कमिटीत कुणाचा समावेश ?
मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, राहुल गांधी, प्रियंका गांधी, अंबिका सोनी, अधीर रंजन चौधरी, दिग्विजय सिंह, चरणजीत सिंह चन्नी, आनंद शर्मा यांच्यासह एकूण ३९ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकारिणीत ३९ सदस्य, ३२ स्थायी निमंत्रित आणि नऊ विशेष निमंत्रितांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातून कोणाला संधी?
मुकुल वासनिक
माणिकराव ठाकरे (प्रभारी)
रजनीताई पाटील (प्रभारी)
अविनाश पांडे (महासचिव)
कायम निमंत्रित
चंद्रकांत हंडोरे
विशेष निमंत्रित
प्रणिती शिंदे
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.