Siraj Mehndi  sarkarnama
मुंबई

काँग्रेसच्या माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

सिराज मेहंदी यांनी उत्तर प्रदेश विधान परिषदेत अनेक वर्षे आमदार म्हणून काम केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : उत्तर प्रदेशमधील काँग्रेस (congress) पक्षाचे माजी आमदार आणि बुजुर्ग नेते सिराज मेहंदी यांनी आज (ता. ११ जानेवारी) मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवार यांच्या यूपीच्या दौऱ्यात मेहंदी यांचे सहकारीही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. (Former Congress MLC Siraj Mehndi joins NCP)

सिराज मेहंदी यांनी उत्तर प्रदेश विधान परिषदेत अनेक वर्षे आमदार म्हणून काम केले आहे. पवार यांनी मेहंदी यांचे राष्ट्रवादी पक्षात स्वागत केले. ते म्हणाले की, माजी आमदार मेहंदी यांनी गांधी-नेहरू यांच्या विचाराने यूपीत गेली ३० ते ४० वर्षे काम केले आहे. काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर सोपवण्यात आलेली राज्य स्तरावरील विविध कामाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. अनेक जिल्ह्यात त्यांचे सहकारी आहेत, त्यांच्याशी चर्चा करूनच ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी आज मुंबईत आले आहेत. येथून परत गेल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करतील आणि त्यानंतर मी यूपीच्या दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांचा प्रवेशाबाबतचा निर्णय होईल.

मेहंदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना योग्य ती ताकद दिली जाईल. उत्तर प्रदेशातील परिर्वतनासाठी एका विचाराचे लोक एकत्रित येतील. त्यांना मेहंदी आणि त्यांचे सहकारी मदत करतील, असेही शरद पवार यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशमध्ये आम्ही समाजवादी पक्षाबरोबर जाणार आहेत. त्या ठिकाणी इतर छोट्या पक्षांनाही सोबत घेतले जाणार आहे. लखनौमध्ये उद्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत आघाडीबाबत चर्चा होणार आहे. त्यात कोणाला कोणत्या आणि किती जागा सोडायच्या हे ठरले जाणार आहेत. त्या बैठकीला उत्तर प्रदेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष के. के. शर्मा हे जाणार आहे.

उत्तर प्रदेशात या निवडणुकीतून परिर्वतन होणार आहे. तेथील लोकांना यंदा बदल हवा आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ८० टक्के लोक आमच्याबरोबर आहे, २० टक्के लोक आमच्यासेाबत नाहीत, असे विधान केले हेाते. हे वीस टक्के कोण, हे एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभा देणारे नाहीत. मात्र त्यांची विचारधारा त्याच पद्धतीची आहे. त्यांच्या मनात जे आहेत, ते त्यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षा विचार मजबूत करण्याची गरज आहे. योगी आदित्यनाथ यांच्या त्या विधानाला उत्तर प्रदेशची जनता या निवडणुकीतून उत्तर देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT