नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे. नवी मुंबई पोलिसांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांच्यावर तडीपारीची कारवाई केली. मढवी यांनी काही दिवसांपू्र्वीच शिंदे गटावर गंभीर आरोप केले होते. शिंदे गटात सामील होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून दबाव टाकला जात, असल्याचा, आरोप मढवी यांनी केला होता.
मढवी यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणात केला होता. मढवी यांना मुंबई उपनगरे व ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच एम. के. मढवी यांनी पोलिसांवर आरोप केले होते.
शिंदे गटात जा, अन्यथा तडीपार करु, एन्काऊंटर करु, अशी धमकी पोलीस उपायुक्तांनी दिल्याचा गंभीर आरोप मढवी यांनी केला होता. मढवी यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने तडीपारची कारवाई केली असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
मढवी यांनी काही दिवकांपूर्वी पत्रकार परिषद घेत आरोप केले होते. शिंदे गटात सामील होण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. तसेच तुम्ही 'मातोश्री'वर जाऊ नका, माझ्याकडे आलात तर तुमच्या कुटुंबियांचे आणि कार्यकर्त्यांचे नुकसान होणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले, असल्याचे मढवी म्हणाले होते.
पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनीही मला शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तुमचा एन्काऊंटर करू, अशी धमकी दिली, असल्याचे मढवी म्हणाले होते. तसेच 10 लाख रुपयांची मागणी केली होती. माझ्यावर खोटे आरोप व खोट्या केसेस करून तडीपारीची कारवाई करुन नोटीस दिल्याचे मढवी म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.