Sudhir More  Sarkarnama
मुंबई

Sudhir More Death : रेल्वेखाली उडी घेऊन ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची आत्महत्या

Mangesh Mahale

Mumbai : शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते, माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आहे. घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वेस्थानकाजवळ ही घटना घडली.

सुधीर मोरे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मोरेंच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विक्रोळी परिसरातील सामाजिक कामात मोरे सक्रीय कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने एक सच्चा शिवसैनिक गमावला असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

मोरे यांच्यावर काही वर्ष रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी होती. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. ठाकरे गटाचे नेते, माजी परिवहनमंत्री अनिल परब यांनी टि्वट करीत मोरेंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT