महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवलीमध्ये खिंडार पडत आहेत. पंचवीस वर्ष नगरसेवक राहिलेले दिवंगत वामन म्हत्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काही तासांतच तीन नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेविका सायली विचारे यांनी पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला. महेश पाटील हे कल्याण ग्रामीण शिवसेना शिंदेसेनेचे तालुकाप्रमुख होते. महेश पाटील हे रवींद्र चव्हाण यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. तर भाजपच्या माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी घरवापसी केली आहे. अजून काही माजी नगरसेवक हेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
आज सकाळी डोंबिवली पश्चिमेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे यांनी रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अनमोल म्हात्रे हे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेत सध्या आलबेल नसल्याचे चित्र दिसते.
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेतून आज भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमुळे शिवसेनेची गळती अद्यापही थांबली नसल्याचे चित्र आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्याला रविंद्र चव्हाण यांनी खिंडार पाडले आहे. पण नगराध्यक्ष आहे महायुतीचाचा होणार, असे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी असतात, त्यामुळे महायुतीत फूट पडली असे म्हणणे चुकीचे आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
अनमोल म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशामुळे गणेशनगर ते देवीचापाडा येथील पालिका प्रभागातील चार सदस्यांच्या निवडणूक प्रक्रियेत फेरबदल होण्याची शक्यता स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. अनमोल म्हात्रे यांच्या भाजपमधील एन्ट्रीने महाराष्ट्रनगर, देवीचापाडा प्रभागात शिवसेनेत उभी फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे, ज्यामुळे महायुतीतील मित्र पक्षांमध्ये (भाजप आणि शिवसेना) चुरस निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.