Anmol Mhatre Joins BJP: शिंदे बाप-लेकाशी कुठे बिनसलं? भाजपने डाव टाकला; दिवगंत वामन म्हात्रेंच्या मुलाचा भाजप प्रवेश

Kalyan Dombivli Mahanagarpalika: काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर ‘आता राजकारणातील नवीन अध्यायाला सुरूवात करण्याची वेळ आली आहे,’ अशी पोस्ट अनमोल म्हात्रे यांनी शेअर केली होती. त्यांची ही पोस्ट डोंबिवली परिसरात चर्चेत विषय ठरली होती.
Kalyan Dombivli Mahanagarpalika
Kalyan Dombivli MahanagarpalikaSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivli Mahanagarpalika: डोंबिवलीचे कसलेले राजकारणी अशी ओळख असलेले डोंबिवली पश्चिमेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे यांनी कुठल्या पक्षात प्रवेश घ्यायचा याचा अखेर निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने डोंबिवलीच्या राजकारणात वेगळी समीकरणे मांडण्यात येणार आहे.

काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर ‘आता राजकारणातील नवीन अध्यायाला सुरूवात करण्याची वेळ आली आहे,’ अशी पोस्ट अनमोल म्हात्रे यांनी शेअर केली होती. त्यांची ही पोस्ट डोंबिवली परिसरात चर्चेत विषय ठरली होती.

श्रीकांत शिंदेंना मोठा धक्का

दिवंगत वामन म्हात्रे यांच्या समर्थकांसह विरोधकांच्याही भुवया उंचावल्या होत्या. अनमोल म्हात्रे हे काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. आता अनमोल म्हात्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनमोल म्हात्रे हे भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशाबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. म्हात्रे यांचा भाजप प्रवेश हा शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मोठा धक्का असल्याचे बोलले जाते.

शिंदे बाप-लेकाशी कुठे बिनसले?

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला हा मोठा दणका महायुतीतील भाजपने दिला आहे. ऐन महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर अनमोल म्हात्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला, त्यांचे शिंदे बाप-लेकाशी कुठे बिनसले, याबाबतच्या चर्चा सध्या सुरु आहे.

Kalyan Dombivli Mahanagarpalika
Sanjay Gaikwad News : कट्टर विरोधक नेत्यांच्या 'होममिनिस्टर' भिडणार

शिवसेनेत उभी फूट पडणार

अनमोल यांच्या भाजप प्रवेशामुळे गणेशनगर ते देवीचापाडा येथील पालिका प्रभागातील चार सदस्यांच्या निवडणूक प्रक्रियेत फेरबदल होण्याची शक्यता स्थानिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. अनमोल म्हात्रे यांच्या भाजपमधील एन्ट्रीने महाराष्ट्रनगर, देवीचापाडा प्रभागात शिवसेनेत उभी फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोण होते वामन म्हात्रे

  • डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्रनगर, प्रसाद सोसायटी या प्रभागाचे पंचवीस वर्षांपासून प्रातिनिधित्व करीत होते.

  • महिला मंडळ, सार्वजनिक मित्र मंडळ अशा मंडळांच्या माध्यमातून मतदारांची एक मोठी फळी या प्रभागात आहे.

  • वामन म्हात्रे यांचे लहान बंधू बाळा म्हात्रे हे शिंदे शिवसेनेचे कट्टर समर्थक आहेत.

  • वामन म्हात्रे यांनी बांधलेल्या प्रभागातून पालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.

  • आगामी पालिका निवडणुकीसाठी बाळा म्हात्रे यांनी जोरदार व्यूहरचना आखली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com