Anil Deshmukh Sarkarnama
मुंबई

दोन महिन्यानंतर अनिल देशमुख प्रकटले अन् म्हणाले...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्त वसुली संचालयानलयाची कारवाई सुरू आहे

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात सक्त वसुली संचालयानलयाची (ED) कारवाई सुरू आहे. ते दोन महिन्यांपासून गायब झाल्याची चर्चा सुरू होती. अखेर देशमुख हे प्रकटले असून, त्यांनी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे. याचबबरोबर मागील दोन महिन्यांत करण्यात आलेल्या आरोपांनाही त्यांनी सडतोड जबाब दिला आहे.

आता देशमुखांनी या प्रकरणी मौन सोडले आहे. ते म्हणाले की, प्रसारमाध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या देण्यात आल्या आहेत. माझी याचिका उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आहे, याची माहिती ईडीचे समन्स बजावले त्यावेळी मी दिली आहे. ईडीच्या समन्सला मी वेळोवेळी उत्तर दिले आहे. ईडीने माझ्या घरावर छापे टाकले त्यावेळी मी, माझा परिवार, सहकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सीबीआयने दोन वेळा समन्स पाठवल्यानंतर मी स्वत: जाऊन जबाब नोंदवला होता.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. ते आता कुठे आहेत? प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या पाहिल्यास परमबीरसिंह हे परदेशात पळून गेले आहेत. म्हणजेच माझ्यावर आरोप करणाराच आता पळून गेला आहे. त्यांच्या विरोधात पोलीस खात्यातीलच अधिकारी आणि अनेक व्यावसायिकांनी तक्रारी केल्या आहेत. परमबीरसिंहांचा सहकारी सचिन वाझे यानेही त्यांच्याच सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. त्याला नोकरीतून काढून टाकण्याची प्रक्रिया मी केल्यानंतर माझ्यावर आरोप करण्यात आले. अशा लोकांच्या आरोपांवरून मला व माझ्या कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जात आहे. माझ्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत कधीही असे आरोप झालेले नाही. अशा लोकांनी केलेल्या आरोपांची चौकशी आज ईडी आणि सीबीआय करीत आहे याचे मला अतिशय दु:ख आहे, असेही देशमुख म्हणाले.

देशमुख यांच्या विरोधातील 100 कोटी वसुली प्रकरणाच्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पहिली अटक काल (ता. 31 ऑक्टोबर) केली आहे. संतोष जगताप या मध्यस्थाला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर अनिल देशमुख दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. ईडीने त्यांना चौकशीसाठी पाच समन्स बजावली होता. मात्र, देशमुखांनी 2 महिने कायदेशीर मार्गांचा अवलंब करीत चौकशीला हजर राहणे टाळले होते.

दरम्यान, मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. देशमुख यांच्या नागपूर, मुंबई येथील घरांसह विविध कंपन्यांवर केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचानलयाकडून छापेमारी करण्यात आली होती. देशमुख यांच्यासह त्यांच्या मुलांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण राज्यात चांगलेच चर्चेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT