गायब झाल्याची चर्चा असलेले देशमुख थेट 'ईडी'च्या कार्यालयात अवतरले

परमवीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता.
Anil Deshmukh
Anil Deshmukhsarkarnama

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या विरोधात सुरू असलेल्या 100 कोटी वसुली प्रकरणाच्या सीबीआय तपासात पहिली अटक रविवारी (ता. ३१ ऑक्टोबर) झाली आहे. संतोष जगताप या मध्यस्थाला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर अनिल देशमुख दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज (ता. १) ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. ईडीने त्यांना चौकशीसाठी पाच समन्स पाठवले होते. मात्र, देशमुख २ महिने गायब होते.

ईडीच्या समन्स विरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयाच याचिका केली होती मात्र, ती याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर देशमुख आज ईडी कार्यालयात स्वतःहा हजर झाले आहेत. यावेळी देशमुख म्हणाले, सीबीआयचे समन्स आले. मी सीबीआयला जाऊन स्टेटमेंट दिले आहे. अजून ही माझी केस सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. आज मी ईडी कार्यालयामध्ये हजर झालो. परमवीर सिंग यांनी खोटे आरोप केले. ते आज कुठे आहेत, असा सवालही देशमुख यांनी केला.

Anil Deshmukh
शिवसेना नाशिकला एकहाती सत्ता घेईल...त्यासाठी बूथप्रमुखांनी सर्वस्व पणास लावावे!

दरम्यान, मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. देशमुख यांच्या नागपूर, मुंबई येथील घरांसह विविध कंपन्यांवर केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचानलयाकडून छापेमारी करण्यात आली होती. देशमुख यांच्यासह त्यांच्या मुलांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण राज्यात चांगलेच चर्चेत आहे.

Anil Deshmukh
दिवाळीच्या तोंडावरच लाचखोरीत ग्रामपंचायत सदस्य जाळ्यात ; सरपंच निसटला

कथित 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयकडून पहिली अटक झाली आहे. ठाण्यातून संतोष जगताप या मध्यस्थाला अटक करण्यात आली आहे. याआधी सीबीआय रिपोर्ट्स लीक केल्याच्या प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि एका सीबीआय अधिकाऱ्यालाही अटक केलेली होती.

त्यांच्यावर ठाणे आणि इतर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ठाणे पोलिसांनी त्यांच्याविरोधात लूक आऊटची नोटीस बजावली आहे. मात्र ते कोठेही आढळून येत नाहीत. शंभर कोटींच्या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चांदीवाल समितीसमोरही परमीवर सिंग हे हजर झाले नाहीत. त्यांनी वकिलास‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ देत त्यांच्या माध्यमातून समितीसमोर हजेरी लावली होती. आरोप झाल्यानंतर देशमुख हेही गायब झाले होते. गेल्या काही दिवसांपासून सीबीआय देशमुख यांच्या मागावर होती, तसेच ईडीकडून त्यांना चौकशीसाठी वारंवार बोलविण्यात आले होते. त्यामुळे आज अखेर देशमुख यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com