Sameer Wankhede
Sameer Wankhede Sarkarnama
मुंबई

दीड महिन्यानंतरही एनसीबी सोडेना समीर वानखेडेंची पाठ; अधिकारी दिल्लीतही पोहचले

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली: अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) दिल्लीत गेले असले तरी क्रुझ ड्रग्ज प्रकरणाने अद्याप पाठ सोडलेली नाही. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या (NCB) टीमने वानखेडे यांनी जवळपास 20 प्रश्न विचारले. त्यामुळे वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

वानखेडे हे भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकारी आहेत. त्यांचा एनसीबीतील कार्यकाळ 31 डिसेंबरला संपला आहे. क्रुझ ड्रग्ज प्रकरणात वानखेडे यांच्यासह एनसीबीवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची एनसीबीची अंतर्गत समिती चौकशी करत आहे. सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला याप्रकरणात अटक करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यानंतर एनसीबीसह वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर एनसीबी संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली.

वानखेडे यानी शनिवारी तिसऱ्यांचा चौकशी करण्यात आली आहे. एनसीबीने ऑक्टोबर 2021 मध्ये ही चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलने केलेल्या 25 कोटी रुपयांच्या लाचेच्या आरोपांनंतर ही चौकशी सुरू झाली. वानखेडे यांचा मागील महिन्यात एनसीबीतील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा आपल्या मुळ विभागात पाठवण्यात आले आहे. त्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच त्यांची चौकशी करण्यात आली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी चौकशीदरम्यान अनेक मुद्यांवर बोट ठेवल्याचे समजते. आर्यन खानला अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणी का केली नाही, सर्व आरोपींचा पंचनामा वेगळा का नाही, असे प्रश्न वानखेडे यांना विचारण्यात आले. एनसीबीच्या कार्यालयात माहिती देणारा आर्यन खानशी कसा बोलत होता, याबाबतही अधिकाऱ्यांनी वानखेडेंना सवाल केला.

एनसीबीशी संबंध नसलेली व्यक्ती कार्यालयात का बसली होती. तसेत ती आर्यन खानला बाहेरील व्यक्तीशी फोनवरून बोलण्यास कशी सांगत होती, तसेच एनसीबीचा अधिकारीही त्यावेळी उपस्थित नव्हता, असे मुद्देही अधिकाऱ्यांनी चौकशीदरम्यान उपस्थित केल्याचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. दरम्यान, चौकशी समितीकडून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चौकशीचा अहवाल एनसीबीच्या महासंचालकांना सादर केला जाऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT