Vinayak Raut Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Vs BJP : भाजपची टीका झोंबली; ठाकरेंचा शिलेदार खोचकपणे म्हणाला, 'यातच मोठं यश'

Ratnagiri Vinayak Raut Amit Shah Devendra Fadnavis Ashish Shelar ShivSena Uddhav Thackeray BJP Mahavijay Shirdi : भाजपनं शिर्डीतील महाविजय अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला विनायक राऊत यांचे जोरदार प्रत्युत्तर दिले.

Pradeep Pendhare

Mumbai News : शिर्डी इथल्या महाविजय अधिवेशनात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

"भाजप नेत्यांची उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका म्हणजे, उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रातील वर्चस्व आहे, हे भाजपला मान्य आहे", असा खोचक टोला विनायक राऊत यांनी भाजपला लगावला.

माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी इथं माध्यमांशी संवाद साधताना शिर्डीतील (Shirdi) भाजपच्या महाविजय अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. 'राज्यात इतर घटनांवर, विकासांच्या मुद्यांवर न बोलताना फक्त महाराष्ट्रातील नेत्यांवर टीका करण्याचा धंदा भाजप नेत्यांनी लगावला आहे. एवढं मोठं बहुमत मिळून सरकार स्थापन केलं आहे, त्यातून विकास कामांवर आता बोलावं', असा सल्ला देखील विनायक राऊत यांनी दिला.

'केंद्र सरकार निधीच्या बाबतीत महाराष्ट्राला डावललं जात आहे, यावर न बोलतात उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार यांच्यावर टीका करणार असतील तर त्यांनी वारंवार महाराष्ट्रात यावं', असा खोचक टोला विनायक राऊत यांनी भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांना लगावला. तसेच 'शिवसेनेने स्वबळावर लढण्याची भूमिका अद्याप तरी घेतलेली नाही. ती कार्यकर्त्यांची भावना होती. स्वबळावर लढण्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील', असेही विनायक राऊत यांनी म्हटले.

बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण सुरेश धस यांनी बाहेर काढलं. बीडचे हे हत्याप्रकरण राज्यात गाजत आहे. दिल्ली देखील याचे पडसाद उमटले आहे. परंतु यातून बीडची बदनामीच सर्वाधिक झाली, असे म्हणत मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर तोफ डागली होती. त्यावर विनायक राऊत यांनी निशाणा साधला.

मंत्री पंकजा मुंडे यांना सल्ला...

विनायक राऊत यांनी सुरेश धस यांच्यावर टीका करण्याऐवजी पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्या कामाची माहिती घ्यावी. सत्याची बाजू घेतली म्हणून पंकजा मुंडेंचा तीळपापड होत असेल, तर त्यांना टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, असे म्हटले. मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमधील घटनेची नैतिकता स्वीकारून अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला पाहिजे, असेही विनायक राऊत यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT