Ekhnath Shinde sarkarnama
मुंबई

शिवसेनेला आणखी एक धक्का; माजी आमदाराचा शिंदे गटाला पाठिंबा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekhnath Shinde) यांच्या गटाला पाठिंबा वाढत चालला आहे

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekhnath Shinde) यांनी बंड केल्यानंतर आमदार आणि खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तसेच शिवसेनेतील (ShivSena) अनेक पदाधिकारीही शिंदे गटात गेले आहेत. बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदार संघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

मंगळवारी शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादीचे नेते विजय वाडकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह आमदार संजय रायमुलकर आणि संजय गायकवाड यांनी शिंदे गटाला या आधीच पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता खेडेकर यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.

जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक खासदार, दोन आमदार आणि आता माजी आमदारांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यामुळे पक्षा समोरील अडचणी वाढल्या आहेत. जिल्ह्यात पुन्हा शिवसेना उभी करण्याचे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर असणार आहे.

या वेळी बोलताना शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ते म्हणाले, बाळासाहेबांनी आपल्या विचारांशी व शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी कधीही तडजोड केली नाही. प्रसंगी त्यांनी सत्तेला लाथ मारली. ते म्हणायचे की, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांना कधीही जवळ करणार नाही. त्यांना जवळ करण्याची वेळ येईल, तेव्हा मी माझे दुकान म्हणजे शिवसेना पक्षच बंद करेन, अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतलेली होती, असेही शिंदे यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहूनच आपण शिवसेना मोठी केली, असे शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कुणी केली, असा सवाल त्यांनी केला. बाळासाहेबांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून ज्या लोकांसोबत आपण निवडून आलो. त्यांच्या विचारांशी प्रतारणा कुणी केली, असेही ते म्हणाले. आपल्याला मते देणाऱ्या मतदारांशी बेईमानी कुणी केली, हे सर्व आम्ही बोलू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. सध्या मी सज्जन भाषेत बोलतो आहे. मात्र, यावर मी नक्की बोलणार आहे, असेही शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT