Eknath Shinde : शिंदे साहेब..., आपण ८ दिवस बोलले होते, पण आता दोन महिने उलटले !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पात्र उमेदवारांनी निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांत प्रकरण मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : लेखी परीक्षा, वाहन चालक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी, वैद्यकीय तपासणी, सेवा पूर्व प्रशिक्षण असे पदभरतीचे सर्व टप्पे पार करत राज्यातील २८०० उमेदवार एसटीच्या (ST) सेवेसाठी पात्र ठरले. यात नागपूर विभागातील १९० जणांचा समावेश आहे. मात्र, दोन वर्ष होऊनही नियुक्ती मिळाली नाही. मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पात्र उमेदवारांनी निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांत प्रकरण मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, दोन महिने होऊनही ठोस निर्णय झाला नसल्याने उमेदवारांमध्ये मोठी नाराजी आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ने २०१९ मध्ये चालक तथा वाहक (कनिष्ठ) या पदासाठी सरळसेवा भरती घेतली. लेखी परीक्षा नंतर पुणे येथे वाहन चालक चाचणी, वाहकाचे प्रशिक्षण, कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय चाचणी अशा भरतीच्या सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्या. याला दोन वर्षापेक्षा अधिकचा काळ लोटून गेला. मात्र, पात्र उमेदवारांना अद्यापही नियुक्ती देण्यात आली नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे बहुतांश उमेदवारांचा यात समावेश आहे. नोकरी मिळत नसल्याने सर्व उमेदवार हताश झाले आहेत.

नागपूरसह राज्यातील इतर काही पात्र उमेदवारांनी दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘संबंधित विभागाला आदेश देतो आणि ८ दिवसात प्रकरण मार्गी लावतो’ असे आश्वासन दिले. मात्र, उमेदवार अजूनही आश्वासन पूर्ततेच्या प्रतीक्षेत आहे. त्यानंतर उमेदवार आजही मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची वाट बघत आहेत. आज ना उद्या आदेश निघतील, या प्रतीक्षेत हे सर्व लोक आहेत.

Eknath Shinde
Maratha Reservation: एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचा आवाज दाबला?

कंत्राटी भरायचे होते तर आमची भरती का घेतली ?

महामंडळाने २८ जून रोजी जाहिरात काढून राज्यात कंत्राटी पद्धतीने ५ हजार चालकांची भरती करण्याचा घाट घातला. याला उमेदवारांचा विरोध आहे. आधी आमची नियुक्ती करा नंतरच ही भरती घ्या. अशी मागणी उमेदवारांची आहे. कंत्राटी भरायचे होते तर आमची भरती का घेतली ? असा सवाल उमेदवारांनी केला आहे.

दोन वर्षापासून महामंडळाच्या नियुक्ती पत्राची वाट पाहतो आहे. मात्र, आमची थट्टा केली जात आहे. घर खर्च चालविणे अवघड झाले आहे. डिलिव्हरी बॉयचे काम करून पैसे गोळा करतो आहे. त्या पैशांनी पुन्हा मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार.

- आकाश गेडाम, पात्र उमेदवार नागपूर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com